
शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी, दुष्काळ , कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा !हो पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली? ह्याला कोण जबाबदार? ह्याची कारणे क उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का? आता हेच बाघा ना!
अकोला : शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी, दुष्काळ , कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा !हो पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली? ह्याला कोण जबाबदार? ह्याची कारणे क उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का? आता हेच बाघा ना !
यंदाच्या हंगामात जिल्हयात लागवड झालेले कपाशीचे सुमारे ८० टक्के क्षेत्र बोंडअळी व बोंडसडमुळे पोखरून टाकले. अकोट, तेल्हारा या दोन तालुक्यातील १०० टक्के क्षेत्राला याचा फटका बसलाय.
याबाबत कृषी विभागाने आपला प्राथमिक अंदाज शासनाकडे दिला असून जिल्हयात या हंगामात पेरणी झालेल्या एक लाख ४५ हजार ८९४ हेक्टर कपाशीपैकी १ लाख १६ हजार ५३४ हेक्टरवरील पीक बाधित झाल्याचे म्हटलंय.
गेल्या वर्षात कापसाला चांगला दर मिळाला होता. शिवाय उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत ठिकठाक राहीले होते. त्याचा परिणाम या हंगामात शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे वाढला. त्यामुळे लागवड क्षेत्र १ लाख ४६ हजार हेक्टरपर्यंत पोहचले होते.
सुरवातीच्या काळात कपाशीचे पीक चांगले होते. पाऊस वेळेवर आल्याने पिकाची वाढ, फुल, फळधारणा होण्याच मोठी मदत झाली. परंतु पीक परिपक्व होत असतानाच कपाशीवर बोंडअळीचा उद्रेक सुरु झाला. त्यापाठोपाठ सलग पाऊस आल्याने परिपक्व झालेल्या कपाशीच्या बोंडांमध्ये सड लागली. शेतकऱ्यांनी यासाठी महागड्या कीडनाशकांच्या फवारण्याही घेतल्या. परंतु आतमध्ये कीड पसरल्याने त्याचा फारसा फायदा झाला नाही.
यानंतर कापसाचे बोंड व्यवस्थित उमलले नाही. कापूस वेचणीसाठी गेलेल्या मजुरांना एक-एक पाकळी काढताना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे जो कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला तो कवडीयुक्त मिळाला.
शिवाय वेचणीचा खर्चही अधिक वाढला. आता कापसाचा दर्जा योग्य नसल्याने त्याचा फटका दराना बसत आहे. एफएक्यु दर्जाचा कापूस कमी प्रमाणात निघाला आहे. बोंडअळी व बोंडसडचा प्रादुर्भाव झालेल्या शेतातील उत्पादन ५० टक्क्यांच्या आत आले. अनेक शेतकऱ्यांना एकरी तीन ते पाच क्विंटलदरम्यान कापूस झाला. लागवड झालेल्या क्षेत्रापैकी ८० टक्क्यांवर क्षेत्र बाधीत असल्याची माहिती कृषी विभागाने वरिष्ठांकडे सादर केली आहे.
अकोट, तेल्हारा तालुक्यात १०० टक्के बाधित
जिल्हयात या हंगामात खरीपात अकोट तालुक्यात ३७७५४ हेक्टर आणि तेल्हारा तालुक्यात २३२७६ हेक्टरवर पेरणी झाली होती. या तालुक्यात कपाशीवर बोंडअळी व बोंडसडचा प्रादुर्भाव झालेला आहे. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर हा अहवाल देण्यात आला आहे. अकोल्यात १८४९०, बाळापूरमध्ये १५५७६ हेक्टरवर नुकसान दाखविण्यात आले. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळण्याची अपेक्षा लागलेली आहे.
तालुका निहाय बाधित क्षेत्र
अकोला १८४९० हेक्टर
बार्शीटाकळी ६५१९
मूर्तीजापूर ८७५०
अकोट ३७७५४
तेल्हारा २३२७६
बाळापूर १५५७६
पातूर ६१६८
एकूण ११६५३४
(संपादन - विवेक मेतकर)