esakal | कापूस विकून पैसे घरी आणले, दरोडेखोरांनी केला सशस्त्र हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Cotton sold at Sangrampur and brought home, armed attack by robbers

तालुक्यातील एकलारा बानोदा येथे तीन अज्ञात दरोडेखोरांनी दोन घरात दरोडा घालून सशस्त्र हल्ला केला.

कापूस विकून पैसे घरी आणले, दरोडेखोरांनी केला सशस्त्र हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा)  ः तालुक्यातील एकलारा बानोदा येथे तीन अज्ञात दरोडेखोरांनी दोन घरात दरोडा घालून सशस्त्र हल्ला केला.

चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला करून चोरटे पसार झाल्याची घटना (ता.१८) च्या पहाटे घडली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दोन घरातून एकूण ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे.


अरुण कोकाटे बाहेरगावी गेले असल्याने चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून श्रीकृष्ण धुळे यांच्या घरात घुसले. धुळे यांच्या घरातून पेटी लंपास केली पेटीमध्ये कापूस विकून आलेले पैसे ठेवलेले होते.

हे सुरू असताना श्रीकृष्ण धुळे याचा मुलगा प्रमोद धुळे याने एका चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये चोरट्याच्या इतर साथीदारांनी प्रमोद धुळे यांचेवर चाकूने हल्ला केला. त्या हल्ल्यात प्रमोद गंभीर जखमी झाले असून, त्यांचेवर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती तामगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गुरुवारी (ता.१९) ला श्वान पथक आणि फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले होते. या दरोड्याने गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)