शहरी भागातच कोविडचा प्रभाव अधिक, नागरी भागात संसर्ग झालेल्यांचे प्रमाण १७ टक्के, ग्रामीण भागात १४ टक्के

Akola News: Covid is more prevalent in urban areas, 17 per cent in urban areas and 14 per cent in rural areas.
Akola News: Covid is more prevalent in urban areas, 17 per cent in urban areas and 14 per cent in rural areas.

अकोला  ः कोरोना विषाणू कोविड-१९ चा प्रभाव हा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातच अधिक असल्याचे नागरिकांच्या सिरो सर्व्हिलन्स तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात प्रत्येक १०० नागरिकांमागे १५ जणांना कोविडची लागण झाली असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यात शहरी भागातील प्रमाण हे १७ टक्के तर ग्रामीण भागातील प्रमाण १३ टक्के आहे.

सिरो सर्व्हिलर्न्स तपासणी अहवाल प्रसिध्द
या सर्व्हेमध्ये ता. ७ ते १८ सप्टेंबर २०२० पर्यंत व्यक्तींचे रक्त नमुने घेण्यात आले. यापैकी शहरी विभागातून एकूण ११०५ रक्त नमुने, तर ग्रामीण विभागातून एकूण १९७० रक्त नमुने जमा करण्यात आले. कोविड आजाराची लागन होण्याची शक्यता अधिक असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, पत्रकार इत्यादी गटामधून देखील एकूण ३३५ रक्त नमुने घेण्यात आले.

त्यानंतर या सर्व रक्त नमुण्यामधून किती रक्त नमुण्यामध्ये कोविड आजाराच्या संबंधित ॲन्टिबॉडी(प्रतिजैविके) आढळली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील जीवरसायनशास्त्र विभागामध्ये तपासण्यात आले.

एकूण २९७५ रक्त नमुण्यापैकी ४५१ (१५.१६ टक्के) रक्त नमुण्यामध्ये ॲन्टिबॉडी (प्रतीजैविके) आढळली आहेत. याचा अर्थ की शंभर व्यक्तीमागे १५ व्यक्तींना कोविड आजाराची लागन होवुन गेली व त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे किंवा सौम्य प्रकारची लक्षणे आढळली व त्यांना कोवीडचा आजार होवून गेला, असे निर्दशनास आले.


संपूर्ण जिल्ह्यात एकूण २९७५ रक्त नमुण्यापैकी ४५१ (१५.१६ टक्के) रक्त नमुण्यामध्ये ॲन्टिबॉडी (प्रतीजैविके) आढळली आहेत, ग्रामीण भागात एकूण १९७० रक्त नमुण्यापैकी २६८ (१३.६० टक्के) रक्त नमुण्यामध्ये ॲन्टीबॉडी (प्रतीजैविके) आढळली आहेत, शहरी विभाग एकूण ११०५ रक्त नमुण्यापैकी १९० (१७.१९ टक्के) रक्त नमुण्यामध्ये ॲन्टीबॉडी (प्रतीजैविके) आढळली आहेत, तर अती जोखमीचा गटातील एकूण ६३५ रक्त नमुण्यापैकी ७५ (११.८१ टक्के) रक्त नमुण्यामध्ये अॅन्टीबॉडी (प्रतीजैविके) आढळून आली असल्याचे संशोधन अहवालामधून निर्दशनास आले आहे.

अजुनही बहुतांश जनतेला कोविड-१९ या आजाराची लागण झालेली नाही त्यामुळे पुढील काळात बहुतांश लोकांना कोविड-१९ आजाराची लागन होण्याची संभावना आहे. त्याकरिता स्वत:चे व कुटुंबाचे या आजारापासून संरक्षण करण्याकरिता नागरिकांना सर्वोतोपरी खबरदारी घेण्याचे, आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com