esakal | ओबीसी मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Crime filed against OBC front workers

ओबीसी आरक्षण बचाव माेर्चा काढल्यानंतर सिटी काेतवाली पाेलिसांनी मोर्चाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

ओबीसी मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः ओबीसी आरक्षण बचाव माेर्चा काढल्यानंतर सिटी काेतवाली पाेलिसांनी मोर्चाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अ.भा. महात्मा फुले समता परिषदेतर्फे तुकाराम बिडकर, बळीराम सिरसकार, हरिदास भदे यांनी माेर्चाचे विना परवाना आयाेजन केले. माेर्चात ३०० ते ४०० जण सहभागी झाले.

काेविड-१९च्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी काही आदेश पारीत केले असून, माेर्चात आदेशाचे उल्लंघन झाले. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असनाताही फिजिकल डिस्टंन्सिंग न ठेवता राेगाचा फाैलाव हाेईल, असे कृत्य केल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रकरणी भादंवी आणि साथ राेग अधिनियमनाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोषणांनी दणानला होता परिसर
ओबीसी बचाव माेर्चात सहभागी झालेल्या महिला-पुरुष, युवक-युवतींनी आरक्षण बचावाबाबत दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणानला होता. हाता फलक घेवून घोषणाबाजी करीत मोर्चाला बस स्थानकापुढील स्वराज्य भवनातून सुरुवात झाली. ‘उठ ओबीसी जागा हाे, आरक्षणाचा धागा हाे’, ‘ओबीसी जनगणना झालीच पाहिजे’, ‘आरक्षणाच्या हक्का खातर ओबीसी उरतली रस्त्यावर’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ आदी घोषणा व हाता फलक घेवून हजारो ओबीसी महिली व पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते.

जिल्हाभरातील संघटनांचा सहभाग
ओबीसी आरक्षण बचाव माेर्चात बारा बलुतेदार संघ, कुणबी विकास मंडळ, भावसार समाज, माळी युवा संघटन, कुंभार महासंघ, परीट महासंघ, कोळी संघटना, खोरीप, जय मल्हार सेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top