esakal | धोका वाढला; दिवसभरात ६१ नव्या रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Danger increased; 61 new patients added in a day

 गत काही दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात नव्या ६१ रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ३८२ अहवाल प्राप्त झाले.

धोका वाढला; दिवसभरात ६१ नव्या रुग्णांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : गत काही दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात नव्या ६१ रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ३८२ अहवाल प्राप्त झाले.


आज दिवसभरात ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

त्यात २१ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सेंट्रल जेल येथील १३, गोरक्षण रोड, बसेरा कॉलनी, शास्त्री नगर, रणपिसे नगर व गीता नगर येथील प्रत्येकी तीन, गणेश नगर, जुने शहर, मोठी उमरी, राम नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित भारती प्लॉट, तेल्हारा, वल्लभ नगर, जठारपेठ, आदर्श कॉलनी, किनखेड पूर्णा, अडगाव बु. ता. तेल्हारा, बाजोरिया नगर, बिर्ला कॉलनी, व्यंकटेश नगर, जीएमसी बॉय हॉस्टेल, तुकाराम चौक, न्यू जैन मंदिर, व्याळा ता. बाळापूर, कान्हेरी सरप ता. बार्शीटाकली, राउतवाडी व बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्यातील गणेशनगर छोटी उमरी येथील पाच जण तर सेंट्रल जेल येथील एक, याप्रमाणे रहिवासी आहे.

१७ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, तर बिऱ्हाडे हॉस्पिटल येथून एक, अशा एकूण १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


ॲक्टिव्ह रुग्ण ६०० वर
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ९५९५ आहे. त्यातील २९६ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ६२० पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image