
सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २६) दिवसभरात ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे.
अकोला : सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २६) दिवसभरात ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून गुरुवारी (ता. २६) कोरोना संसर्ग तपासणीचे ४९८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४६८ अहवाल निगेटिव्ह तर ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
हेही वाचा - - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
त्यातील मलकापूर येथील तीन जण, सातव चौक व निमवाडी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित डाबकी रोड, लक्ष्मी नगर बोरगाव मंजू, माऊली नगर गोरक्षण रोड, मोठी उमरी, जवाहर नगर, ज्योती नगर जठारपेठ, आदर्श कॉलनी, मुक्ताई नगर, बाळापूर, तेल्हारा, गोरक्षण रोड, जठारपेठ व अंभग रेसीडेन्सी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील उगवा, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, छोटी उमरी, मनब्दा ता. तेल्हारा, प्रभात किड्स स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय, रणपिसे नगर, सहकार नगर व लोकमान्य नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
हेही वाचा - - राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !
११ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक, अवघाते हॉस्पीटल येथून एक जण, अशा एकूण ११ जणांना गुरुवारी (ता. २६) डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा - सराफा दुकानातील नोकराने दुकानासमोरच घेतला गळफास!
कोरोनाची सध्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९२४४
- मृत - २८९
- डिस्चार्ज - ८३५३
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६०२
(संपादन - विवेक मेतकर)