esakal | मृत्यूचा आकडा सरकतोय दीड शतकाकडे, एका मृत्युसह 31 नव्या रुग्णांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News The death toll is slipping to a century and a half, with one death adding 31 new patients

अकोल्यात कोरोना बाधितांची आकडेवारी चार हजाराकडे जात असताना कोरोना बळींचा आकडा दीड शतकाकडे वाटचाल करीत आहे. अशातच मंगळवारी (ता.१८) ३१ नव्या रुग्णांची भर पडली असून, एका मृत्युची नोंद झाली आहे.

मृत्यूचा आकडा सरकतोय दीड शतकाकडे, एका मृत्युसह 31 नव्या रुग्णांची वाढ

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची आकडेवारी चार हजाराकडे जात असताना कोरोना बळींचा आकडा दीड शतकाकडे वाटचाल करीत आहे. अशातच मंगळवारी (ता.१८) ३१ नव्या रुग्णांची भर पडली असून, एका मृत्युची नोंद झाली आहे.


मंगळवारी सकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील रिधोरा बाळापूर येथील सहा जण, दहिगाव गावंडे येथील चार जण, गड्डम प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित सिद्धार्थ नगर जूने शहर, कृषी नगर, अष्टविनायक नगर व रायखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दरम्यान सोमवारी रात्री रॅपीड अॅन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

तर सायंकाळी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सहा महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर येथील सहा जण, रिधोरा बाळापूर येथील तीन जण तर उर्वरित मोठी उमरी, मळसूर, जूने शहर, रामदास पेठ, शास्त्री नगर व जठारपेठ चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

एका वृद्धाचा मृत्यू
मंगळवारी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सिद्धार्थनगर, जूने शहर येथील ७४ वर्षीय पुरुष असून, ते १३ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

६४ जण कोरोनामुक्त
मंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ जणांना, कोविड केअर सेंटर येथून ३१ जण, ओझोन हॉस्पीटल येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून आठ जण, कोविड केअर सेंटर अकोट येथून सात जणांना अशा एकूण ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ३२९०
मृत्यू-१३७
डिस्चार्ज- २७५९
दाखल रुग्ण -३९४
(संपादन - विवेक मेतकर)

loading image