जिल्ह्यात आता तीन ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर

Akola News: Dedicated Covid Health Centers at three places in the district
Akola News: Dedicated Covid Health Centers at three places in the district

अकोला :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रस्तावित केल्यानुसार अवघाते बाल रुग्णालय व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मूर्तिजापूर येथे २० खाटा, यूनिक हॉस्पिटल, वाशिम बायपास रोड अकोला येथे १८ खाटा आणि अकोला अक्सिडेंट क्लिनिक, लक्ष्मी नगर अकोला येथे १६ खाटा आवश्यक साहित्य, मनुष्यबळ व सर्व सुविधेसह डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी अटी व शर्तीच्या सुद्धा लावण्यात आल्या आहेत.

या आहेत अटी व शर्ती

  •  डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल केन्द्रामध्ये आयसीएमआर व राज्य आरोग्य, कुंटूब कल्याण विभाग यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.
  • महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश तसेच मार्गदर्शक सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहिल. तसेच नमूद केल्यानुसार बेड ऑक्सीजनसह उपलब्ध करुन देण्यात यावे.
  • डेडीकेटेड कॉविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना ते घेत असलेल्या सोई सुविधांकरीता शासनाचे धोरण तसेच दरपत्रकानुसार उपचाराकरिता शुल्क आकारण्यात यावे. या व्यतिरीक्त इतर प्रकारचे शुल्क आकारण्यात येवू नये.
  • जास्त रक्कमेची आकारणी केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या नियमांचे करावे लागेल पालन

  • कोविड बाधित उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषधसाठा तसेच आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध ठेवण्यात यावे. आयसीएमआर व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे.
  • सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारार्थ लागणारे तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी व अधिकारी वर्ग नियमितपणे उपस्थित ठेवावे लागतील. रुग्णांचे घशाचे किवा नाकाचे नमूने घेण्याची व्यवस्था करावी लागेल.
  • पल्स ऑक्झीमिटर व्हर्चुअल असिस्टंट अँड मॉनिटरिंग, टेलीफोनिक व्हिडीओ कॉल सुविधा पुरविणे आवश्यक राहिल.
  • कोविड केअर सेंटरवर जेवन बाहेरुन बोलविता येणार नाही.
  • प्रस्तावित करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या आजुबाजूचे रहिवासी यांची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेणे बंधनकारक राहिल.
  • एन-९५ मास्क, डिजिटल थर्मामिटर, अत्यावश्यक सेवा चौविस तास पुरविणे आवश्यक राहिल.
  • रुग्णांना सोई सुविधांकरीता नियमानुसार माफक शुल्क आकारावे लागेल.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com