बापरे! धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्याला सापडले सोने, लक्ष्मीपूजनाला तीन गावात दवंडी देऊन केले परत

सदानंद खारोडे | Tuesday, 17 November 2020

धनतेरसला सापडले सोने लक्ष्मीपूजनला घरी जाऊन परत दिले. ही घटना आहे. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार ते हिवरखेड दरम्यानची.

तेल्हारा (जि.अकोला) ः धनतेरसला सापडले सोने लक्ष्मीपूजनला घरी जाऊन परत दिले. ही घटना आहे. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार ते हिवरखेड दरम्यानची.

या दोन गावांच्या मध्ये कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावर हिवरखेड येथिल शेतकरी महादेवराव गावंडे यांना धनतेरसच्या दिवशी सोन्याचा दागिना आढळला. त्यांनी लगेच तीन गावात दवंडी देऊन हे सोने परत केले.

हिवरखेड -तळेगाव बाजार रस्त्याने हिवरखेड येथिल शेतकरी महादेवराव गावंडे यांचे शेत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वरदळ सुरू असते. दिवाळी निमित्त नागरिक सामान खरेदी करण्यासाठी धावपळ करीत असतात

धनतेरसच्या (धनत्रयोदशी)  दिवशी ता.१३ नोव्हेंबरला गावंडे हे आपल्या शेतात दुपारी ३ वाजता गेले असता शेतात पिण्याच्या माठाजवळ एक कागदी पुडी दिसून आली. त्यांनी सदर पुडी उघडली असता त्यात दहा सोन्याचे मनी व दोन डोरले दिसून आले.

त्यांनी तळेगाव बाजार येथील माजी सरपंच भानुदास चोपडे यांना माहिती देवून दोन गावांमध्ये जाऊन दवंडी देऊन सदर सोने ज्याचे असेल त्यांनी पावती दाखवून घेवून जावे अशी माहिती दिली. दवंडी गावात होताच तळेगाव खु. येथिल शेतकरी मनोहर वाकोडे यांचे सोने हरवले असल्याची माहिती मिळाली.

गावंडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी तळेगाव बाजारला येवून पाच ग्रॅम सोने (किंमत २५हजार रुपये) परत केले.  

(संपादन - विवेक मेतकर)