esakal | दिव्यांग धीरजने वाढविली भारताची उंची; वाचा काळजाचा थरकाप उडविणारा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Dheeraj Kalsai to be first Indian to travel from Kashmir to Kanyakumari by bicycle

आकाशाला छेद देणारा आणि काळजाला धडकी भरविणारा लिंगाणा असो की रशीयातील माऊंट एलबुरूज, साऊथ आफ्रिका किलीमांजरो की असो पन्हाळा किंवा पावनखींड धीरजने सर केलेत. 

दिव्यांग धीरजने वाढविली भारताची उंची; वाचा काळजाचा थरकाप उडविणारा प्रवास

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : आकाशाला छेद देणारा आणि काळजाला धडकी भरविणारा लिंगाणा असो की रशीयातील माऊंट एलबुरूज, साऊथ आफ्रिका किलीमांजरो की असो पन्हाळा किंवा पावनखींड धीरजने सर केलेत. 

देशभरातील हायकर्सला हवेहवेसे वाटणारे गिर्यारोहण अकोटच्या धीरजने दिव्यांगत्वावर मात करत पार केलंय. आता तो काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास करायला निघणार आहे. हा प्रवास करणारा तो भारतातील पहिला दिव्यांग ठरणार आहे. मार्च महिन्यानंतर तो ही मोहिम उघडणार आहे.

ज्या हिमशिखरांची उंची पाहून धडधाकट व्यक्तींच्या काळजाचा थरकाप उडतो. मात्र, एक हात आणि एक पाय नसललेल्या जीगरबाज धीरजनं या पर्वतांच्या दूर्गमतेला पराभूत केलं. अकोटचा धीरज कळसाईत... 

नावातच धिरोदात्तपणा असलेल्या धीरजनं देशविदेशातील अनेक गिरीशिखर धडधाकट माणसांच्या वेगाने सर केले. सुरुवातीच्या काळात त्याला साथ मिळाली ती कोल्हापूर येथील शिवराष्ट्र हायकर्स आणि पुणे येथील शिखर फाऊंडेशनची.  आणि हा पराक्रम घडत राहिले.  पण धीरजची कहाणी या लिंगाण्याच्या चढाईपेक्षा खडतर होती.


दाळमिलवर काम करणाऱ्या धीरजचा मीलच्या मशीनमध्ये हात आणि पाय अडकला आणि धीरजला अपंगत्व आलं.  2014 मध्ये त्याचा अपघात झाला होता. नंतर जयपुरी पाय बसविला. मात्र जिद्द सोडली नाही. गिर्यारोहकांची माहिती घेतली. त्यानंतर लिंगाणा, पावनखिंड आणि कळसूबाई सर करून टाकले. ऐन तारूण्यात अपंगत्व आलं म्हणून धीरज खचला नाही. अकोट जवळच्या नरनाळा येथे त्यानं हायकींगचा सराव सुरू केला.  रशीयातील माऊंट एलबुरूज, साऊथ आफ्रिका किलीमांजरो सारखे उंच शिखरं पादाक्रांत केलेत. यातून अनेक रेकॉर्डही त्याने आपल्या नावावर केले.


लहरोंसे डरकर नौका पार नही होती, और कोशिश करने वालोकी कभी हार नही होती, याचं यापेक्षा आणखी कोणतं चांगलं उदाहरण असू शकेल. धीरजनं आपल्या उदाहणातून लोकांसमोर उर्जा, ताकद आणि प्रेरणेचं उदाहण ठेवलंय, याचा प्रत्येकानं आदर्श घेणं गरजेचं आहे.

घरचा विरोध कौतुकात बदलला
हातावर पोट असणारं धीरजचं घर त्यात गिर्यारोहणाचा धीरजचा छंद. सुरूवातीला विरोध झालाच. पण आता पोराचं कौतुक बघून घरच्यांनाही अभिमान वाटतो.  त्याचे धडधाकट मित्र म्हणतात जे आम्ही करू शकत नाही ते त्यानं करून दाखवलंय. आम्हाला धीरजच्या यशाचा खूप आनंद आणि गर्व वाटतो. 

एव्हरेस्ट खुणावतोय
सातपुड्याच्या लेकानं संह्यांद्रीचं शिखर गाठलंय. आता धीरजला एव्हरेस्ट खुणावतोय. मात्र तिथपर्यंत जाण्यात त्याला आव्हानांचं एव्हरेस्ट सर करावं लागणार आहे.  कारण यासाठी ३५ ते ४० लाखांचा निधी हवायं. आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या भरवश्‍यावर बसून राहणारा धीरज नाहीच. त्याने आता नवीन मोहीम उघडी आहे.

loading image
go to top