esakal | Diwali Festival 2020 यंदा जास्त धुराचे फटाके टाळा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Diwali Festival 2020 Avoid high smoke firecrackers this year

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिवाळीनिमित्त जनतेला व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व कोरोना काळात आपली व इतरांची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Diwali Festival 2020 यंदा जास्त धुराचे फटाके टाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिवाळीनिमित्त जनतेला व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व कोरोना काळात आपली व इतरांची काळजी घेण्याचे आवाहन केले.

धुरामुळे कोरोना रुग्णांना त्रास होण्याती शक्यता असल्याने अधिक धुराचे फटाके टाळण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

मागील काही महिन्यापासून देशात कोरोनाचे संकट आले आहे, त्यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या धैर्याने या संकटाला तोंड दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाले आहे .पुढील काळात कोरोनाचे संक्रमण वाढू शकते असा प्राथमिक अंदाज आहे त्या पार्श्वभूमीवर जनतेने संयम राखून आपली व इतरांची काळजी घेऊन खबरदारी घ्यावी. आणि दिवाळीचा सण साजरा करावा. दिवाळी उत्सव साजरा करताना जास्त धुराचे फटाके फोडू नयेत.

या फटाक्यांमुळे कोरोणा मुक्त झालेल्या रुग्णांना दमा सारखे रोग होऊ शकतात व त्यांना त्रास होऊ शकतो तसेच आबालवृद्धांनाही फटाक्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जास्त धूर सोडणारे फटाके उडवू नये किंवा नागरिकांनी फटाके फोडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

दिवाळी उत्सव साजरा करताना मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे व सनितायाझारचा वापर करणे तसेच घरोघरी भेटी देणे टाळावे असे त्यांनी सांगितले. बाजारात वस्तू खरेदी करताना गर्दी टाळावी ,सामाजिक अंतर राखावे, मास्कचा वापर करावा असेही आवाहन त्यांनी केले.जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिवाळीनिमित्त जनतेला व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व कोरोना काळात खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image