अकोला, वाशीम जिल्ह्यात बसविणार ‘डमी वॉर टँक’

सकाळ वृत्तसेेवा | Wednesday, 25 November 2020

देशाच्या सीमेवर सैन्याच्या मदतीला असलेल्या शस्त्रांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी. त्यातून नागरिकांनाही प्रेरणा मिळते. शिवाय सौदर्यिकरणाच्या दृष्टीने त्याचा उपयोग करून घेता यावा यासाठी अकोला आणि वाशीम जिल्ह्यात आठ ठिकाणी डमी वॉर टँँक (रणगाडे) बसविण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिलेल्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मंजुली दिली आहे.

अकोला : देशाच्या सीमेवर सैन्याच्या मदतीला असलेल्या शस्त्रांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी. त्यातून नागरिकांनाही प्रेरणा मिळते. शिवाय सौदर्यिकरणाच्या दृष्टीने त्याचा उपयोग करून घेता यावा यासाठी अकोला आणि वाशीम जिल्ह्यात आठ ठिकाणी डमी वॉर टँँक (रणगाडे) बसविण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिलेल्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मंजुली दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाने अकोला व वाशीम जिल्ह्यात डमी वॉर टँँक बसविण्यास मंजुरील दिली आहे. अकोला जिल्‍ह्यात अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत, नगर परिषद अकोट व मूर्तिजापूर तर नगर पंचायत बार्शीटाकळीच्या जागेत सौदर्यिकरण करून हे टँँक बसविण्यात येणार आहे. वाशीम जिल्‍ह्यामध्‍ये नगर परिषद रिसोड आणि मालेगाव नगर पंचायत याठिकाणी प्रत्‍येकी एक या प्रमाणे डमी वॉरटँक (रणगाडा) बसविण्यात येणार आहे.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

Advertising
Advertising

हे डमी वॉर टँक (रणगाडा) महानगरपालिका व नगर परिषद व नगर पंचायत यांचे अधिनस्‍त असलेल्‍या जागेमध्‍ये लावण्‍यात येणार आहे. त्यामुळे अकोला व वाशीम जिल्‍ह्याच्या सौंदर्यीकरणामध्‍ये अधिक भर पडेल. हे वॉर टँक लवकरच अकोला व वाशीम जिल्‍ह्यामध्‍ये येणार आहेत. शैक्षणिक सहलींमधून विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याच्या कार्यप्रणालीची माहिती देण्याच्या दृष्टीनेही उपयोगी पडणार आहे.

 

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यिकरणानंतर आणखी एकाची भर
अकोला जिल्ह्यात सौंदर्यिकरणाच्या कामातून अकोला रेल्वे स्थानकावर एकशे वीस फुटाचा राष्ट्रीय ध्वज उभारणी, विद्युत रोषणाई तसेच शकुंतला इंजिन बसविण्यात आले होते. आता वॉर टँँक बसविण्यात येणार असल्याने सौंदर्यिकरणात आणखी भर पडणार आहे.

हेही वाचा - VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

सैनिकांच्या शौर्यगाथा व देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत रणगाडे व सैनिकांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे रणगाडे बसविण्यात येत असल्याची माहिती केंद्री राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)