esakal | दुर्गोत्सव, ईद ए मिलाद आणि धम्मचक्रप्रवर्तन दिन साधेपणानेच
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Durgotsav, Eid A Milad and Dhamma Chakra Pravartan Day will be celebrated with simplicity

आगामी काळात येऊ घातलेले दुर्गोत्सव, ईद ए मिलाद व धम्मचक्रप्रवर्तन दिन हे सर्व सण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने, कमीत कमी उपस्थितीत; शक्यतो घरातल्या घरात आणि शासनाच्या नियमांचे पालन करून साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी येथे केले.

दुर्गोत्सव, ईद ए मिलाद आणि धम्मचक्रप्रवर्तन दिन साधेपणानेच

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला  ः आगामी काळात येऊ घातलेले दुर्गोत्सव, ईद ए मिलाद व धम्मचक्रप्रवर्तन दिन हे सर्व सण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने, कमीत कमी उपस्थितीत; शक्यतो घरातल्या घरात आणि शासनाच्या नियमांचे पालन करून साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी येथे केले.


आगामी काळात येऊ घातलेले दुर्गोत्सव, ईद ए मिलाद व धम्मचक्रप्रवर्तन दिन या सणांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विविध सामाजिक कार्यकर्ते व दुर्गोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार आदी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यात बाधीत रुग्ण संख्येचा आकडा वाढला होता. हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यातही उत्सवाच्या काळात ही काळजी अधिक घ्यावी लागेल. पुढे लगेचच दिवाळी सारखा मोठा सण ही येऊ घातला आहे.

त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, मास्कचा वापर करावा. परस्परांमध्ये अंतर राखावे व सॅनिटायझरचा वापर करा, साबणाने हात वारंवार धुवा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

बैठकीच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रास्ताविकात शासनाकडून दुर्गोत्सव साजरा करण्याबाबत प्राप्त नियमावलीचे वाचन करून दाखवले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपली मते व्यक्त केली.

(संपादन - विवेक मेतकर)