
तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर ज्याप्रमाणे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याच प्रमाणे तेल्हारा बस स्थानकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तेल्हारा (जि.अकोला) : तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर ज्याप्रमाणे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याच प्रमाणे तेल्हारा बस स्थानकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेल्हारा तालुक्यातील आरसूळ ते तेल्हारा, हिवरखेड, माळेगाव बाजार , सौंदळा इत्यादी मुख्य रस्त्यावर संबंधित कंत्राटदाराने रस्ते खोदून ठेवून मातीमिश्रित मुरुम टाकल्यामुळे वाहनधारकांना तसेच प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जन पाठीच्या मनक्याच्या आजराने त्रस्त झाले आहे. या खड्डेमय व धूळीच्या रस्त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्यामुळे वाहनधारकांना आपले वाहन चालविताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर हिवाळा, उन्हाळ्यामध्ये या रस्त्यांवर सर्वत्र मातीमिश्रित मुरुम टाकण्यात आल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सर्वत्र पसरलेल्या धुळीमुळे प्रवाशांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. परंतु लोकप्रतिनिधींची संवेदना संपुष्टात आली की काय, असा प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थित करू लागले आहे. एसटीमध्ये प्रवास करताना टू व्हीलर वर प्रवास करताना नागरिकांना धुळीपासून त्रास होत असून, त्यांच्या फुपुस, श्वास मालिकेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेल्हारा बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात बस स्थानकावरील परिसरातील रस्ता उखडला असल्यामुळे त्या रस्त्यावर एसटी बस आली म्हणजे मोठ्या प्रमाणात धुळ उडते व सर्व बसस्थानकावर अस्वच्छतेचे साम्राज्य दिसून येते. संबंधित अधिकारी, आगार व्यवस्थापक यांनी उखडलेला रस्ता दुरुस्त करावा. जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत बस स्थानकावर पाणी मारण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून बस स्थानकावर जे प्रवासी प्रवास करण्याकरिता बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहतात. त्यांना या धुळीपासून होणारा त्रास कमी होणार आहे. प्रवाशांना तालुक्यातील अवस्था झालेल्या रस्त्यांमुळे प्रवास करताना धुळीसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. (संपादन - विवेक मेतकर) |
|||