लॉकडाउनच्या पूर्वसंध्येला 21 रुग्णांची भर, रुग्णसंख्या दोन हजारावर, एका आत्महत्येसह 99 मृत्यू

भगवान वानखेडे
Friday, 17 July 2020

अकोल्यात वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तीन दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. असे जरी असले तरी शुक्रवारी (ता.17) मात्र, तब्बल 21 नव्या रुग्णांची भर पडली असून, आता ही रुग्णसंख्या 2100 कडे आगेकूच करीत आहे.

अकोला  ः अकोल्यात वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तीन दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. असे जरी असले तरी शुक्रवारी (ता.17) मात्र, तब्बल 21 नव्या रुग्णांची भर पडली असून, आता ही रुग्णसंख्या 2100 कडे आगेकूच करीत आहे.

शुक्रवारी सकाळी प्राप्त अहवालात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यात अकोट, मूर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगावमंजू, लोकमान्य नगर, सिद्धी विनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड (ता. तेल्हारा), पातूर, येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी सहा जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. ते मोठी उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर, मूर्तिजापूर, हिवरखेड (ता. तेल्हारा) येथील रहिवासी आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

27 जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर मधून 22 तर हॉटेल रिजेन्सी मधून दोन अशा एकूण 27 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 2026
मृत्यू-98
आत्महत्या-1
डिस्चार्ज- 1667
दाखल रुग्ण - 260

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news On the eve of the lockdown, 21 patients were admitted, the number of patients was over 2,000, and 99 deaths, including one suicide