esakal | फुग्यांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरले सिलिंडर अन् मुलांसमोर अचानक झाला स्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Explosion of a gas cylinder filling a balloon, one killed

फुग्यांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमध्ये कार्पेट टाकताना झालेल्या स्फोटात एक ठार झाला तर फुगे विक्रेत्यासह एक मुलगा जमखी झाला.

फुग्यांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरले सिलिंडर अन् मुलांसमोर अचानक झाला स्फोट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : फुग्यांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमध्ये कार्पेट टाकताना झालेल्या स्फोटात एक ठार झाला तर फुगे विक्रेत्यासह एक मुलगा जमखी झाला.

ही घटना अकोला शहरातील रमेश नगरात असलेल्या गौंडपुरा चौकात बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

शेख हमीद शेख यासिन हा फुगे विक्रेत सिलिंडरमध्ये कार्पेट भरून फुग्यात गॅस भरतो. रमेश नगरात त्याने फुगे विकल्यानंतर सिलिंडरमध्ये तो कार्पेट टाकत होता.

त्याचवेळी तेथे पाहण्यासाठी नीलेश दौलतराव दाभाडे व छोटा मुलगा कुणाल मनोज भोंडे हे दोघे थांबले होते. सिलिंडरचा स्फोट झाल्याने नीलेश दाभाडे यांचा जागेवर मृत्यू झाला. कुणाल भोंडे याच्या डोळ्याला दुखापत झाली तर फुगे विकणारा शेख हमीद हे दोघे गंभीर जखमी झाले. डाबकी रोड पोलिसांनी मृतक व जखमींना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

(संपाादन - विवेक मेतकर)