नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 11 November 2020

तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथील अल्पभूधारक शेतकरी हरिभाऊ गोविंदराव थोरात यांनी सोमवारी आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतात सोयाबीन न झाल्यामुळें हरिभाऊ चिंतातुर झाले.

हिवरखेड (जि. अकोला)  ः तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथील अल्पभूधारक शेतकरी हरिभाऊ गोविंदराव थोरात यांनी सोमवारी आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतात सोयाबीन न झाल्यामुळें हरिभाऊ चिंतातुर झाले.

नापीकी झाल्यामुळें पुढे काय करायचे, शेती कसे कसायची? जीवन कसे जगायचे?, पोट कसे भरायचे? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? या विचार चक्रात त्यांनी शेवटी हतबलतेपोटी आणि नैराश्य ग्रस्त होऊन त्यानी आपल्या शेतातच विष प्राशन करुन घेतले.

हे रस्त्यावरच्या लोकांनी पाहीले तेव्हा त्याना तेल्हारा येथिल सामान्य रुग्णालयांमध्ये दाखल केले. तेथून त्यांना अकोला येथील सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले असता मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्याच्या मागे बराच मोठा आप्त परीवार आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावर्षी सुरुवाती पासूनच निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सर्व पिके निघून गेले. कपाशी पासून आशा होती त्यावरही बोंडअळीने आक्रमण केले.

त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी पुरते मेटाकुटीस आलेले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Farmer commits suicide due to infertility