esakal | शेतकरी आत्महत्यांची होणार फेरचौकशी, शासकीय मदतीसाठी ११ प्रकरणं पात्र
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Farmer suicides to be re-investigated, 11 cases eligible for government assistance

शेतकरी आत्महत्या प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र, अपात्र ठरवण्यासाठीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नापिकी व कर्जबाजीपणासह इतर कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ११ प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

शेतकरी आत्महत्यांची होणार फेरचौकशी, शासकीय मदतीसाठी ११ प्रकरणं पात्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ५) शेतकरी आत्महत्या प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र, अपात्र ठरवण्यासाठीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नापिकी व कर्जबाजीपणासह इतर कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ११ प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यासोबतच तीन प्रकरणांना अपात्र ठरवत पाचची फेरचौकशी तर दोन प्रकरण वैद्यकीय अहवालाअभावी प्रलंबित ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली.


सततची नापिकी, सावकार किंवा बॅंकेकडून घेतलेले कर्ज, उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्च अधिक व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात येते. संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या प्रकरण निश्चित करण्यासाठी शुक्रवारी (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक पार पडली. बैठकीत एकूण २१ प्रकरण ठेवण्यात आले. त्यापैकी ११ प्रकरण मदतीसाठी पात्र जाहीर करत तीन प्रकरणांना अपात्र जाहीर करण्यात आले. याव्यतिरीक्त पाच प्रकरणांची फेरचौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे दोन प्रकरणांमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट नसल्याने व्हिसेरा रिपोर्ट करीता प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत समितीचे सदस्य सचिव व इतर सदस्यांची उपस्थिती होती.

--------------
यांचे प्रकरण ठरले मदतीसाठी पात्र
दीपक कात्रे (रा. उगवा, ता. अकोला), गजानन अलोट (रा. आगर, ता. अकोला), सुधाकर ढोरे (रा, खरब ढोरे, ता. मूर्तिजापूर), हरिभाऊ थोरात (रा. गोर्धा, ता. तेल्हारा), प्रल्हाद सराळ (रा. उगवा, ता. अकोला), गणेश अवचार (रा. पाथर्डी, ता. तेल्हारा), दशरथ भारसाकळे (रा, सिरसोली, ता. तेल्हारा), दत्ता मानकर (रा. मनात्री बु., ता. तेल्हारा), तुकाराम राठोड (रा, उजळेश्वर, ता. बार्शीटाकळी), रविंद्र धाडसे (रा. खानापूर, ता. पातूर), विनायक बागलकर (रा. पारडा, ता. अकोट).

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

 

 

 

 

 

loading image