
राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा तुर्तास भिखुंडखेड, बाभुळखेड, गाजीपूर तीन गावांमधील शेतकऱ्यांना वाढीव माेबदला मिळणार आहे. उर्वरित सहा गावांतील शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
अकोला, : राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा तुर्तास भिखुंडखेड, बाभुळखेड, गाजीपूर तीन गावांमधील शेतकऱ्यांना वाढीव माेबदला मिळणार आहे. उर्वरित सहा गावांतील शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सात वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे चाैपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी बाळापूर तालुक्यासह इतरही ठिकाणच्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. मात्र या भूसंपादनाचा अल्प माेबादला मिळाला असून, माेबादला देताना भेदभाव करण्यात येत असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला होता. भूसंपादन माेबदल्याप्रकरणी कासारखेड, भुखंडखेडसह आणखी काही गावांबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी हाेती. त्यात कासारखेड, कास्तखेड, शेळद, कान्हेरी, व्याळा, रिधाेरा परिसरातील शेतकरी वाढीव माेबदल्यापासून वंचित आहेत. सध्या भिखुंडखेड, बाभुळखेड, गाजीपूर परिरसरातील जवळपास ५० शेतकऱ्यांचे निवाडे जारी करण्यात आले आहेत. प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी संख्या १०० पेक्षा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (संपादन - विवेक मेतकर) |
|||