शेतकरी पेरणार नाहीत कांदा, बियाण्याचे भाव गगनाला

सकाळ वृत्तसेेवा | Friday, 20 November 2020

कांद्याच्या बिजवाई ने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बिजवाई च्या वाढत्या दराने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. कांदा बियाणे तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होत असून, वाढत्या दराला प्रशासनाने आडा घालून वाढीव दराने बिजवाई विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

पिंपळगाव राजा (जि.बुलडाणा)  ः कांद्याच्या बिजवाई ने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बिजवाई च्या वाढत्या दराने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. कांदा बियाणे तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होत असून, वाढत्या दराला प्रशासनाने आडा घालून वाढीव दराने बिजवाई विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

पिंपळगाव राजा व परिसरातील खेडेगावांमध्ये बिजवाई ची विक्री करणारे सक्रिय झाले असून, शेतकऱ्यांना वाढीव अव्वाच्या सव्वा भावात बिजवाई ची विक्री करीत आहेत. कांद्याचे रोप टाकायला परिसरात सुरुवात झाली असून, काही शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

मात्र, यावर्षी वाढीव दराने शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी कांद्याचे पीक घेऊ शकणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अल्पभूधारक शेतकरी बांधवांनी केली आहे.

मागील वर्षी कांदा बिजवाई प्रति ५०० रुपये किलो दराने घेतली होती. यावर्षी बिजवाई चे भाव गगनाला भिडले असून, तीन ते चार हजार रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे लागवड करू शकणार नाही.
-हरिभाऊ देशमुख, शेतकरी, राहुड

(संपादन - विवेक मेतकर)