फवारणीचा पहिला बळी;विषबाधेमुळे शेतमजूराचा मृत्यू!

सुगत खाडे  
Friday, 28 August 2020

कीटकनाशक फवारणीमुळे बाळापूर तालुक्यातील बटवाळी बु. येथील शेतमजूर रामदास पांडुरंग सोळंके (वय ४७) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २७) उजेडात आली. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा फवारणीमुळे शेतकरी व शेमजूरांच्या मृत्यूचे सत्र सुरू होण्यास सुरूवात झाल्याचे दिसून येते.

अकाेला :  कीटकनाशक फवारणीमुळे बाळापूर तालुक्यातील बटवाळी बु. येथील शेतमजूर रामदास पांडुरंग सोळंके (वय ४७) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २७) उजेडात आली. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा फवारणीमुळे शेतकरी व शेमजूरांच्या मृत्यूचे सत्र सुरू होण्यास सुरूवात झाल्याचे दिसून येते.

यापूर्वी २०१८ मध्ये जिल्ह्यात ११ शेतकरी व शेतमजूरांचा फवारणीमुळे मृत्यू झाला होता. यावर्षी रामदास सोळंके हे फवारणीचे पहिले बळी पडले असले तरी अद्यापपर्यंत ६२ वर शेतकरी, शेतमजूरांना फवारणीतून विषबाधा झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सन् २०१८ मध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतमजूर तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली हाेती.

त्यावेळी यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीचे सर्वात जास्त बळी गेले हाेते. अकाेला जिल्ह्यात सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे ११ शेतमजूर व शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे विषबाधा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले हाेते.

बापरे... आकाशवाणी केंद्रावर अतिरेक्यांचा हल्ला!

सदर घटनेनंतर यावर्षी सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधेच्या घटना समोर येत आहेत. यावर्षी बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु. येथील रामदास पांडुरंग सोळंके (वय ४७) हे सोमवारी (ता. २४) शेतात फवारणीसाठी गेले होते. फवारणीनंतर घरी परतल्यावर रात्री ११ वाजता त्यांच्या पोटात अचानक दुखायला लागले.

त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सोमवारीच त्याचा फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला. सदर शेतमजूराच्या घरी शेतजमीन नसल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
 अरे हे काय ? फवारणीचा काळ अन् जनजागृतीचा दुष्काळ, विषबाधा टाळण्याचा  प्रशासनाला पडला विसर | eSakal
वऱ्हाडात वाढल्या घटना
अकोल्यासह शेजारील बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुराला विषबाधा होण्याच्या घटना समोर येत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये ६२ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. येणाऱ्या काळात पिकांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यात येणार असल्याने फवारणीमुळे विषबाधा होण्याची घटना सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News First victim of spraying; Farmer dies due to poisoning!