esakal | घरकुलाचे आमिष दाखवून शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याचा महिलेवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Former Shiv Sena office bearer tortures a woman by showing the lure of Gharkula

घरकुलचा लाभ मिळवून देतो असे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार तामगाव पोलिस ठाण्यात पीडितेने केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घरकुलाचे आमिष दाखवून शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याचा महिलेवर अत्याचार

sakal_logo
By
पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : घरकुलचा लाभ मिळवून देतो असे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार तामगाव पोलिस ठाण्यात पीडितेने केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ३५ वर्षीय महिलेवर जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील ४५ वर्षीय आरोपी संतोष दांडगे याने घरकुलाचे आमिष देत वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

गुन्हा दाखल असलेली व्यक्ती ही राजकीय पदाधिकारी असल्याचे या महिलेचे म्हणणे असून, त्याच्या मालकीचा पेट्रोलपंपही आहे. मुलींना जीवे मारण्याची आणि संबंधाचे केलेले चित्रिकरण जाहीर करून बदनामीची धमकी आरोपी देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पाच ते सहा वर्षांपासून अशाप्रकारे तिच्यावर वारंवार बलात्कार होत होता.

घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी पीडिता ६ सप्टेंबर रोजी त्याच्या पेट्रोलपंपावर गेली असता शरीरसंबंधाबाबत कुठे वाच्यता करू नको, अन्यथा वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचे आणि मारहाण करून यावेळी घराबाहेर हाकलल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत विखे करत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)