esakal | विधवा महिलेला पैसे दिले नाहीत म्हणून नाकारले घरकुल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Gharkul refused as widow was not paid

पंधरा हजार रुपयांची मागणी पूर्ण न केल्यामुळे सरपंच व सचिव आपल्या विधवा आईला सर्व योजनांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप या तालुक्यातील गोरेगावच्या एका मुलीने सरकार पोर्टलवर दिलेल्या तक्रारीत केला आहे

विधवा महिलेला पैसे दिले नाहीत म्हणून नाकारले घरकुल

sakal_logo
By
प्रा.अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला) : पंधरा हजार रुपयांची मागणी पूर्ण न केल्यामुळे सरपंच व सचिव आपल्या विधवा आईला सर्व योजनांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप या तालुक्यातील गोरेगावच्या एका मुलीने सरकार पोर्टलवर दिलेल्या तक्रारीत केला आहे.

नेहा रामदास सरदार ही आपल्या तक्रारीत आसे म्हणते की, तिच्या आईला रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ती पूर्ण न केल्याने प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म देखील सरपंचांनी नाकारला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दुसरीकडे ग्राम पंचायत सदस्यांच्या नातलगांना पक्के घर असूनही रमाई योजनेचा दोनदा लाभ दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. सरकार पोर्टलवरील ही तक्रार निकाली काढण्याकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे गेल्या ३१ ऑगस्टला पाठविली आहे.

जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनिही त्या दिवशी ही तक्रार येथील गटविकास अधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्याने योग्य ती कारवाई करण्यासाठी पाठाविली आहे व तात्काळ अहवाल मागविला आहे.

यासंदर्भात (सध्या ग्रा.पं.ची मुदत संपून कार्यभार प्रशासकाकडे असल्यामुळे) तत्कालीन सरपंच ताई सुनिल सरदार यांना विचारणा केली असता, ‘सदर महिला आपल्याकडे आलीच नाही, त्यामुळे पैसे मागण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. हा राजकीय बनाव आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image