esakal | सुटी मंजुर करुन बिल काढण्यासाठी मागितली लाच, बीडीओसह कनिष्ठ सहाय्यकाला न्यायालयीन कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News grants leave, seeks bribe to issue bill, junior assistant with BDO remanded in judicial custody

पंचायत समिती बार्शीटाकळीत प्रभारी गट विकास अधिकारी (बीडीओ) पदी कार्यरत गोपाल राजाराम बोंडे (वय ५६) व पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक अनंत तुळशीराम राठोड (वय ३९) यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी (ता. १०) अटक करण्यात आली होती. सदर दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सुटी मंजुर करुन बिल काढण्यासाठी मागितली लाच, बीडीओसह कनिष्ठ सहाय्यकाला न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By
सुगत खाडे

 
अकोला :  पंचायत समिती बार्शीटाकळीत प्रभारी गट विकास अधिकारी (बीडीओ) पदी कार्यरत गोपाल राजाराम बोंडे (वय ५६) व पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक अनंत तुळशीराम राठोड (वय ३९) यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी (ता. १०) अटक करण्यात आली होती. सदर दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये कार्यरत तक्रारदार यांच्या रजेच्या कालावधीमधील रजा मंजूर करुन बिल मंजूर करण्याकरिता बार्शीटाकळीचे प्रभारी बीडीओ आरोपी गोपाल बोंडे व कनिष्ठ सहाय्यक अनंत राठोड यांनी तक्रारदाराला १५ हजार रुपयांची मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली असता आरोपी कनिष्ठ सहाय्यक अनंत तुळशीराम राठोड याला लाच घेताना अटक केली होती. सदर दोन्ही आरोपींना शुक्रवारी (ता. ११) न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

(संपादन - विवेक मेतकर)