esakal | प्रधानमंत्री सूक्ष्मसिंचन योजनेचे अनुदान रखडले!, शेतकरी अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Grants of Pradhan Mantri Micro Irrigation Scheme stagnant!

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक संच बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. सन २०१९/२० करीता शासनाने ७५ ते ८० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते.

प्रधानमंत्री सूक्ष्मसिंचन योजनेचे अनुदान रखडले!, शेतकरी अडचणीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि.वाशीम) :  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक संच बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. सन २०१९/२० करीता शासनाने ७५ ते ८० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते.

परंतु अनुदानाची रक्कम मागील कित्येक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.


प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना राज्य सरकार, केंद्र सरकारतर्फे संयुक्तपणे चालविली जाते. यामध्ये राज्य व केंद्राचा हिस्सा समाविष्ट असतो. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान मर्यादा तर इतर मोठ्या शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान मर्यादा असून,

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सन २०१९/२० अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन अनुदान अल्पभूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के व इतर मोठ्या शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान देण्याची घोषणा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणीस यांचे सरकार असताना त्यांनी केली होती.

७५ ते ८० टक्के अनुदान मिळणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी नियमानुसार ऑनलाइन अर्ज कले व पुर्वसमती मिळाल्यानंतर त्यांच्या शेतावर ठिबक संच बसवले आहेत.

मात्र, सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नाही. यावर्षी अतिवृष्टी झाल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाचा करावा लागत आहे.

दिवाळीपूर्वी अनुदानाची रक्कम जमा होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती मात्र, सात महिन्याचा कालावधी होऊनही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आले नाही. त्यामुळे त्वरित अनुदाची रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात यावी, अशी शेतकऱ्याच्या वतीने मागणी होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)