esakal | दिवाळी साजरी कशी करावी? शासनाने बिलंच दिले नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: How to celebrate Diwali? The government did not issue bills

राज्य शासनाने सर्व विभागातील कंत्राटदारांचे देयके दिवाळीपूर्वी अदा करावे, अन्यथा आम्ही काळी दिवाळी साजरी करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि संघटनेच्या वतीने शासकीय कंत्राटदार राहुल सावजी व इतर कंत्राटदारांनी दिला आहे.

दिवाळी साजरी कशी करावी? शासनाने बिलंच दिले नाहीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

पिंजर (जि.अकोला)  ः राज्य शासनाने सर्व विभागातील कंत्राटदारांचे देयके दिवाळीपूर्वी अदा करावे, अन्यथा आम्ही काळी दिवाळी साजरी करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि संघटनेच्या वतीने शासकीय कंत्राटदार राहुल सावजी व इतर कंत्राटदारांनी दिला आहे.

गत अनेक महिन्यांपासून शासनाने सर्वच विभागाच्या कंत्राटदारांचे देयके दिले नाहीत, त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. शासनाने देयके अदा करावी म्हणून कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आदी संघटनांनी दिवाळी पूर्वी सर्व कंत्राटदारांना देयके अदा करावी. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, ग्रामविकास, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदी सर्वांना देयके तात्काळ मिळावी म्हणून निवेदने दिली आहेत. तरीसुध्दा शासनाने गांभीर्य घेतले नाही. परिणामी लहान आणि मोठ्या कंत्राटदारावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

बांधकामाचे देयके न मिळाल्यामुळे प्रत्येक कंत्राटदार आता हतबल झाला आहे. त्यांनी दिवाळी साजरी कशी करावी? मजुरांना आणि साहित्य आणण्यासाठी उसनवारी केली त्याची परतफेड कशी करावी? इतर कामकाज, मेंटनसची कामे कशी करावी, असा प्रश्न कंत्राटदारासामोर आहे.

येथील शासकीय कंत्राटदार राहुल सावजी यांनी संघटनेच्या वतीने शासनाला हा प्रश्न केला आहे. त्यासाठी राज्य शासनाने बांधकाम मंत्र्यांनी सर्व देयके दिवाळी पूर्वी द्यावित, अन्यथा आम्ही काळी दिवाळी साजरी करू, असा ही इशारा शासकीय कंत्राटदार राहुल सावजी यांनी संघटनेच्या वतीने सर्व मंत्री महोदयांना दिला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top