esakal | माय-लेकीची भेट ठरली अखेरची, भाऊबीजेच्या पूर्वसंध्येलाच अज्ञात वाहनाने दिली धडक
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Husband and wife killed in two-wheeler collision

मेहकर ते सुलतानपूर राज्य महामार्गवार गारवा हॉटेल जवळ अज्ञात वाहणाच्या धडकेत दुचाकी स्वार पती- पत्नी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (ता. १५) दुपारी २ .३० वाजताच्या सुमारास घडली.

माय-लेकीची भेट ठरली अखेरची, भाऊबीजेच्या पूर्वसंध्येलाच अज्ञात वाहनाने दिली धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुलतानपूर (जि.बुलडाणा)  ः मेहकर ते सुलतानपूर राज्य महामार्गवार गारवा हॉटेल जवळ अज्ञात वाहणाच्या धडकेत दुचाकी स्वार पती- पत्नी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (ता. १५) दुपारी २ .३० वाजताच्या सुमारास घडली.


मेहकर तालुक्यातील शेदला येथील मुळ रहिवासी व सध्या मेहकर येथे राहत असलेले नालेगावकर दापंत्य हे देऊळगाव मही येथून मुलीच्या घरुन परत जात असताना काळाने घाला घात. भाऊबिजेच्या पूर्वसंध्येलाच माय -लेकींची ती अखेरची भेट ठरली.

रामेश्वर सीताराम नालेगावकर (वय ४९) व त्याची पत्नी भाग्यश्री रामेश्वर नालेगावकर (वय ४३) हे स्कूटी क्रमांक एएल २४३६ ने जात असताना सुसाट वेगातील अज्ञात वाहनाने नालेगावकर यांच्या गाडीला माघून जबर धडक दिली.

त्यात नालेगावकर दांपत्य चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाले. त्या अज्ञात वाहनाचा शोध मेहकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात मेहकर पोलिस घेत आहेत. मृतक दांपत्यास दोन मुली असल्याची माहिती आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image