esakal | घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पतीस अटक आणखी एकाचा शोध सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Husband and wife quarrel over domestic dispute, accused husband arrested, search for another continues

 कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १९) रात्री आपातापा रोडवरील दमानी रुग्णालय परिसरात घडली. संगीता प्रशांत इंगळे असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी पती प्रशांत इंगळे याला तात्काळ तर फरार असलेला आरोपी विक्की गोपी यास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आज अटक केली.

घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पतीस अटक आणखी एकाचा शोध सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १९) रात्री आपातापा रोडवरील दमानी रुग्णालय परिसरात घडली. संगीता प्रशांत इंगळे असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी पती प्रशांत इंगळे याला तात्काळ तर फरार असलेला आरोपी विक्की गोपी यास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आज अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, मृतक महिला संगीता प्रशांत इंगळे ही गेल्या सहा वर्षांपासून तिच्या दोन मुलांसह अकोट फैल परिसरात राहत होती. पती प्रशांत इंगळे हा रोजगारासाठी नाशिक येथे राहत असून, त्याचे आईवडील आपातापा रोड स्थित एकता नगर परिसरात वास्तव्यास आहेत.

प्रशांत हा दिवाळीसाठी आई-वडिलांकडे आला होता. दरम्यान प्रशांत हा मोठ्या मुलाला आपल्या सोबत नाशिकला घेऊन जाणार होता. मात्र, मुलाला पतीसोबत नाशिकला पाठविण्याचा विरोध करत महिलेने मुलाला मारण्यास सुरुवात केली.

त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात प्रशांतने पत्नी संगीतावर चाकूने हल्ला करत तिला ठार केले. पत्नी संगीताचा मृत्यू झाल्यानेत पती प्रशांतने स्वत:ला अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सुत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

ही घटना सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सिव्हिल लाईन्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात फरार असलेला आरोपी विकी गोपी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ बोरकर , आशिष ठाकुर, रवि यादव , रवि काटकर आदींनी केली.


आरोपीस २३ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर
या हत्याकांडातील आरोपी पती प्रशांत इंगळे याने घटनेनंतर पोलिसांच्या स्वाधीन केले आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी ठाणेदार भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)