धरणाचं पाणी पेटतंय, वानच्या पाण्याची पळवा-पळवी न थांबल्यास धरणावर आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा | Tuesday, 24 November 2020

तेल्हारा तालुक्याच्या हद्दीत वारी भैरवगड येथे वान नदीवर हनुमान सागर प्रकल्प (वान धरण) तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीचे सिंचनासाठी बांधण्यात आला आहे. या धरणाचा मूळ उद्देश सिंचन हाच होता.

तेल्हारा (जि.अकोला)  ः सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वान धारणा व्यतिरिक्त राजकारणी नेत्यांनी इतर ठिकाणचा पर्याय न शोधता जळगाव जामोद, शेगाव, अकोला नंतर आता बाळापूर येथे वान धरणाचे पाणी पळवापळविचा घाट रचला.

या संदर्भातील शासन निर्णय रद्द करून बाळापूरचा प्रस्ताव सुद्धा थांबवा, अन्यथा शेगाव, जळगावला गेलेले पाणी तर थांबवून वान धरणावर तीव्र आंदोलन करू, असा इशारा तेल्हारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी बांधवांनी दिला आहे.

तेल्हारा तालुक्याच्या हद्दीत वारी भैरवगड येथे वान नदीवर हनुमान सागर प्रकल्प (वान धरण) तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीचे सिंचनासाठी बांधण्यात आला आहे. या धरणाचा मूळ उद्देश सिंचन हाच होता.

Advertising
Advertising

हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक

धरण बांधणीचे प्रस्तावावेळी तेल्हारा तालुक्यातील १९ हजार १७७ हेक्टर जमीन धरणाचे पाण्यातून सिंचनाकरिता प्रस्तावित होती. त्या करिता १०६.३४५७ द.ल.घ.मी. पाणी आवश्यक होते; परंतु धरण बांधल्यानंतर धरणातील पाण्याची क्षमता ८४ .४३४ द.ल.घ.मी. आहे. त्यामधील दरवर्षी ३ द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन तसेच ३ द.ल.घ.मी. पाण्याची धरणातून गळती होते.

त्यामुळे धरणामध्ये जिवंत साठा फक्त ७८.४३४ द.ल.घ.मी. इतका आहे. त्यामुळे मुळातच सिंचनाकरिता २७.७७२४ द.ल.घ.मी. इतक्या पाण्याची तुट आहे. पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता शासनाने या धरणातून अकोट शहराकरिता ८.६६ द.ल.घ.मी., तेल्हारा शहराकरिता ३.१६ द.ल.घ.मी., जळगाव जा. शहराकरिता ४.०२ द.ल.घ.मी. ८४ खेडी योजने करिता ४.२३९ द.ल.घ.मी., शेगाव शहराकरिता ५.६२ द.ल.घ.मी. तसेच जळगाव तालुक्यातील खेड्यांकरिता ८.४५४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित केले आहे.

हेही वाचा -  भाजप म्हणतेय, शाळा बंदच ठेवा; गरिबाच्या मुलांना मोफत स्मार्ट फोन द्या

अकोला शहर अमृत योजने करिता २४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित झालेले आहे; परंतु या योजनेला शासनाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. तेल्हारा-अकोट मतदारसंघातील १५९ खेडी योजना सुद्धा प्रस्तावित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता व पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते. त्यामुळे धरणा जवळील सिंचनाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहचत आहे.

सध्या परिस्थितीत तेल्हारा तालुक्यातील वान धरणाच्या परिसरातील फक्त ५ ते ६ गावांना वान धरणाचे पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत आहे. त्यामुळे तालुक्यातील १०० गावांना पिण्याकरिता वानचे धरणाची आवश्यकता आहे व तसा प्रस्ताव सुद्धा प्रलंबित आहे. अकोट तालुक्यातील बऱ्याच गावांत सुद्धा पाणी नाही.

 

हेही वाचा -  ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

अशातच बाळापूर मधील खेड्यांकरिता पिण्याच्या पाण्याची मागणी आहे व सदर मागणी ही ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणचे सर्व गावे हे बाळापूर तालुक्यातील उपलब्ध धरणाच्या परिसरातील आहेत. त्यामुळे वान धरणातून बाळापूर तालुक्यात १०० कि.मी. पाणी नेण्याचा जो घाट रचला जात आहे, त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकरिता लागणारा करोडो रुपये खर्च हा शासनाचे तिजोरीतून जाणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण ९ प्रकल्प त्यातील बाळापूर तालुक्यात ३ प्रकल्प असून, ३ मोठ्या नद्या आहेत. तरीही वान धरणाचे पाणी बाळापूरकरिता मागणी असल्याने तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे पाण्यावर बाळापूर तसेच अकोला तालुक्यातील राजकारण्यांचा डोळा आहे.

मतदारसंघाबाहेरील राजकारण्यांचा पाण्यावर डोळा
वान धरणाचे बांधणीचे वेळी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाकरिता शेतकऱ्यांनी कॅनॉल तसेच पाठसरी करिता लाखो रु किमतीच्या करिता कवडी मोल भावाने दिल्या तसेच जमिनी संपादित करतांना शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतांना धरणाचे पाणी सिंचानाकारीतच आहे असे अर्जामध्ये नमूद होते परंतु सन २००५ पासून वान प्रकल्प तेल्हारा तसेच पाठबंधारे विभाग अकोला यांनी पाणी वापर संस्था पुनर्गठीत केल्या नाहीत त्यामुळे कॅनॉलच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यात वान प्रकल्प तेल्हारा व पाटबंधारे विभाग अकोला अपयशी ठरले आहेत. व त्यामुळे धरणामध्ये पाणी शिल्लक दिसते व यावर तेल्हारा-अकोट मतदारसंघाबाहेरील नेत्यांचा यावर डोळा असतो.

तेल्हारा येथे आज ठिय्या
पाणी पळविण्यास विरोध म्हणून ता. २४ नोव्हेबर रोजी सकाळी ११ वाजेपासून दिवसभर शांततेच्या मार्गाने तहसील कार्यलय तेल्हारा येथे एकदिवशीय ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन वान धरणावर जाऊन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पत्रकार परिषदेला परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)