
दुचाकीने घरी जाणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीस अडवून तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून १३ हजार ४०० रुपये जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना सोमवारी (ता. २१) च्या रात्री उशिरा अटक केली आहे.
मंगरुळपीर (जि.वाशीम) ः दुचाकीने घरी जाणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीस अडवून तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून १३ हजार ४०० रुपये जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना सोमवारी (ता. २१) च्या रात्री उशिरा अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत सदाशिव झंझाड (वय ४५) रा. हुडको कॉलनी मंगरुळपीर यांनी तक्रार दिली की, ता. ११ च्या रात्री नऊ वाजता फिर्यादी हे त्यांचे दुकान बंद करून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे मागून पत्रकार कॉलनी रस्त्याने घरी जात असताना मागून दुचाकीने चार जण आले.
हेही वाचा : महाबीज मुख्यालयात पोलिस बंदोबस्त, भागधारक संतापले, ऑनलाइन सभा आधीच गाजली ऑफलाइन
त्यातील एकाने फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून जमिनीवर पाडले तर दुसऱ्याने खिशातील १३ हजार ४०० रुपये जबरीने काढून घेतले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि नुसार गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : चारशे वर्षांनंतर घडून आली दोन ग्रहांची भेट, अकोलेकरांनी अनुभवला अनोखा नजारा
या प्रकरणाचा तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी हाती घेतला. तपासात पोहेकॉं ज्ञानेश्वर राठोड, डिबी पथकाचे पोलिस कर्मचारी अमोल मुंदे, मोहम्मद परसुवाले, सचिन शिंदे, रवी वानखडे तसेच सुनील गंडाईत, मिलिंद भगत यांनी सोमवारी (ता. २१) च्या रात्री प्रकरणातील आरोपी सतिष कैलास प्रधान (वय २२) रा. मोहगव्हान ता. मंगरुळपीर व आकाश किसन मोरे (वय २७) रा. शहापूर, मंगरुळपीर यांना अटक केली. मंगळवारी (ता.२२) पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार (ता.२४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)