लोकमान्यांच्या ‘गीतारहस्याला’ ‘श्रीं’ची प्रेरणा, संत गजानन महाराजांच्या भेटीतून साकारले मंडालेच्या तुरुंगातील गीतारहस्य

विवेक मेतकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

लोकमान्य जहाल विचारसरणीचे खरे पण, त्यांना संतदर्शनाची ओढ होती. त्यांचे आध्यात्मिक विचारही प्रबळच. त्यांना समाजाला पुढे न्यायचं होतं आणि त्यासाठी देशाला स्वातंत्र्य हवं होतं. त्यांना समकालीन अशा शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दर्शनाचा योग आला. गजानन महाराजांच्या कृपाप्रसादासोबतच टिळकांना सावधगिरीचा इशाराही मिळाला होता.

अकोला  ः स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे हे स्मृतीशताब्दी वर्ष. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. लोकमान्य टिळक यांच्या गीतारहस्याला शेगावीच्या श्री संत गजानन महाराजांचीच प्रेरणा असल्याचे ‘गजानन विजय’ ग्रंथाच्या पंधराव्या अध्यायातून उद्‍बोधीत होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

लोकमान्य जहाल विचारसरणीचे खरे पण, त्यांना संतदर्शनाची ओढ होती. त्यांचे आध्यात्मिक विचारही प्रबळच. त्यांना समाजाला पुढे न्यायचं होतं आणि त्यासाठी देशाला स्वातंत्र्य हवं होतं. त्यांना समकालीन अशा शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दर्शनाचा योग आला. गजानन महाराजांच्या कृपाप्रसादासोबतच टिळकांना सावधगिरीचा इशाराही मिळाला होता.

हेही वाचा - तत्त्वज्ञानी, निष्काम कर्मयोगी !

Image may contain: one or more people, text that says "श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १५ वा श्री गजानन महाराज उजव्या बाजूस बसले असून लो. टिळक भाषण करीत आहेत."

‘श्री’ आणि गीतारहस्य
गीतारहस्य ग्रंथ लिहिला जाण्याचा संदर्भ विशेषत्वाने गजानन महाराजांशी जोडला जातो. अकोला इथे शिवजयंतीसाठी टिळक गेले असता महाराजसुद्धा त्याच व्यासपीठावर होते. टिळकांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध अत्यंत जहाल भाषण करायला सुरुवात केली. तेव्हा महाराजांना जाणवलं अशा प्रकारच्या भाषणाने या व्यक्तीला मोठी शिक्षा नक्की होईल आणि नेमकं झालंही तसच. टिळकांना पुढे काळ्यापाण्याची शिक्षा झाली पण, महाराजांना हेही जाणवलं की या शिक्षेमुळे याच व्यक्तीकडून एक महान कार्यही घडेल आणि मंडाले तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य लिहिलं.

हेही वाचा - प्रगल्भ समाजाच्या निर्मितीसाठी... 

Image may contain: 1 person, text

तुरुंगातून लेखन अन् सुटकेनंतर प्रकाशन
लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला ‘गीता रहस्य’ अथवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ पहिल्यांदा १९१५ मध्ये प्रकाशित झाला. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी लोकमान्य टिळक यांनी यावर २० वर्षे चिंतन, मनन आणि अभ्यास केला. मंडालेच्या कारागृहात असताना टिळकांनी या ग्रंथाचे लेखन केले आणि तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हा ग्रंथ प्रकाशित झाला होता.

हेही वाचा - लोकांचे अर्थतज्ज्ञ 

टिळकांचे गीतारहस्य समाजात रुजविण्याची गरज
आज शंभर वर्षांनंतरही परिस्थिती बदलेली नाही. आजचा समाजही निद्रितावस्थेतच आहे. प्रत्येकजण सुखाच्या आणि पैशांच्या मागे धावतोय. असुरक्षितता, जीवघेणी स्पर्धा, कमी श्रमात मोठे यश, महागाई, भ्रष्टाचार वाढला आहे. निष्काम कर्मयोगाचा आणि आपल्या कर्तव्याचा सगळ्यांनाच विसर पडला आहे. त्यामुळे ‘गीतारहस्य’ ग्रंथातून लोकमान्य टिळकांनी मांडलेला निष्काम कर्मयोग आणि कर्तव्याचा विचार सद्यपस्थितीत पुन्हा एकदा समाजात रुजविण्याची आवश्यकता आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - पत्रकारितेचे आदर्श 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Inspired by Shree gajanan maharaj shegaon, Lokmanya tilak wrote Gitarahasya