Video: बच्चू कडू भाऊचा रिपोर्ट निगेटिव येऊ दे रे देवा! चिमुरड्याचे डोळे डबडबले, व्हिडीओ व्हायरल

विवेक मेतकर
Monday, 21 September 2020

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोना लागण झाली असल्याचे स्पष्ट्र झाले आहे. कालच त्यांनी सोशल मिडियातून या बाबतची माहिती दिली होती. त्यांच्या पत्नी व कुटुंबातील इतर १२ जणांना लागण झाली आहे. बच्चू कडू हे आंदोलनातील नेते आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी ते नियमीत आवाज उठवत असतात.

अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोना लागण झाली असल्याचे स्पष्ट्र झाले आहे. कालच त्यांनी सोशल मिडियातून या बाबतची माहिती दिली होती. त्यांच्या पत्नी व कुटुंबातील इतर १२ जणांना लागण झाली आहे. बच्चू कडू हे आंदोलनातील नेते आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी ते नियमीत आवाज उठवत असतात.

लोकांमध्ये थेट संपर्कात राहिल्याने बच्चू कडू यांच्याबद्दल आपुलकीचं वातावरण आहे. बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एका चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत एक मुलगा बच्चू कडू लवकर बरे व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. या व्हिडीओत हा मुलगा म्हणतो की, देवा बच्चू कडू भाऊलेबरोबर निगेटिव्ह आणू दे, त्यांना काहीच नको होऊ दे असे म्हणत आहे.

 

बच्चू कडू यांनी स्वत:हा व्हिडिओ शेअर केला आहे. व म्हटले आहे की, बेटा मला काहीच नाही होणार, औषधासोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही तु रडला तर मला बर वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो.

Image

खुप मोठा हो सेवा कर अशा शब्दात बच्चू कडूंनी त्या चिमुरड्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. रविवारी सकाळी अकोला येथे कोविड रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Let the report of Bachchu Kadu Bhau come negative! small boy prayer to God, the video goes viral