esakal | रविवारी सात उपकेंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Maharashtra State Pre-Service Examination at seven sub-centers on Sunday

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०, रविवारी (ता.११) वाशीम शहरातील सात परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

रविवारी सात उपकेंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम  ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०, रविवारी (ता.११) वाशीम शहरातील सात परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

या सातही परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा वाशीम शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस.एम.सी. इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय या सात उपकेंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही.

(संपादन - विवेक मेतकर)