esakal | मोटरसायकल सर्व्हिसींगला टाकलीय, होऊ शकते फसवणूक!

बोलून बातमी शोधा

Akola News Motorcycle servicing can be fraudulent!}

तुमच्याकडे मोटरसायकल असेल आणि तीला तुम्ही दुरुस्तीला टाकत असाल तर लक्ष द्या. कारण, पॉप्युलर हिरो होंडा सर्व्हिस सेंटर वर्कशॉपमध्ये दुरुस्तीला आलेल्या मोटारसायकलमध्ये खराब झालेले स्पेअरपार्ट न बदलविता, थातुर मातुर दुरुस्ती करून बोगस बिल वसुल करीत वाहनधारकाची फसवणूक केली.

मोटरसायकल सर्व्हिसींगला टाकलीय, होऊ शकते फसवणूक!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बार्शीटाकळी (जि.अकोला)  : तुमच्याकडे मोटरसायकल असेल आणि तीला तुम्ही दुरुस्तीला टाकत असाल तर लक्ष द्या. कारण, पॉप्युलर हिरो होंडा सर्व्हिस सेंटर वर्कशॉपमध्ये दुरुस्तीला आलेल्या मोटारसायकलमध्ये खराब झालेले स्पेअरपार्ट न बदलविता, थातुर मातुर दुरुस्ती करून बोगस बिल वसुल करीत वाहनधारकाची फसवणूक केली. पॉप्युलर हिरो होन्डा सर्व्हिस सेंटर ॲटोमॅटिक वर्कशॉप, दक्षता नगरसंकुल अकोलाच्या संचालकास ग्राहक मंचाने दोषी ठरवत चार हजार १५५ रुपये दंड ठोठावला आहे. त्यामधे वाहन दुरूस्तीपोटी वाहनधारकाकडून घेतलेले दोन हजार १५५ रुपये, शारीरिक, मानसिक त्रासापोटी एक हजार रूपये व तक्रार खर्चापोटी एक हजार रुपये समावेश आहे.


पॉप्युलर हिरो होन्डा सर्व्हिस सेंटर, दक्षता नगर संकुल अकोला येथे बाबाराव जानुजी वाघमारे (रा. बार्शीटाकळी) यांची हिरो शाईन क्रमांक एमएच ३o एके ७७६३ हे दुचाकी वाहन ता.१९ डिसेंबर २०१९ ला दुरूस्तीला टाकले. सर्व्हिस सेंटरचे संचालक नाजीर खान यांनी वाहणाची सर्व्हिसिंग, क्लचप्लेट, आईल व इतरही पार्ट बदलावे लागतील असे सांगितले. नाजीर खान यांनी स्पेअर पार्ट बदलणे व वाहण दुरूस्ती पोटी वाहणधारक बाबाराव वाघमारे यांना दोन हजार १५५ रुपये घेतले. तसे बिल देखील दिले. दोन दिवसातच वाहनधारकास वाहनात काही दोष राहिले असल्याचे लक्षात आले. वाहन पिकअप घेत नसल्याचे नाजीर खान यांचे लक्षात आणून दिले. पुन्हा थातुर मातुर मोटरसायकल दुरूस्ती करुन दिली.

दोष मात्र दूर झाला नाही. म्हणून पुन्हा ता.३ फेब्रुवारी २०२० ला मोटरसायकल नाजीर खान यांचेकडे नेली असता वाहणधारकास उद्धटपणाची वागणुक देत हे वाहन माझ्याकडे पुन्हा आणू नका असे बजावले. मोटारसायकलमध्ये खराब झालेली क्लच प्लेट न बदलविता नव्याने ओरीजनल क्लच प्लेट टाकली नसल्याने वाहन पिकअप घेत नव्हते. इतर थातुरमातुर दुरुस्ती केली. अशा प्रकारे ग्राहकाची फसवणूक झाल्यामुळे वाहनधारकास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.

म्हणून पॉप्युलर हिरो होंडा सर्व्हिस सेंटरचे संचालक नाजीर खान यांनी वाहन दुरुस्ती खर्चाची रक्कम दोन हजार १५५ रूपये व त्रासापोटी दोन हजार रुपये असे एकूण चार हजार १५५ रुपये वाहनधारकास द्यावे असा निकाल ग्राहक मंच अकोला न्यायालयाचे अध्यक्ष श्रीमती एस. एम. उंटवाले , सदस्य सुहास आळशी व उदयकुमार सोनवणे यांनी आदेश पारीत केला आहे. या आदेशामुळे वाहणात बोगस स्पेअर पार्ट व थातुर मातुर दुरुस्ती करून पैसे उखळणाऱ्यांना ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटरधारकांना आळा बसेल.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा -