
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ नागपूर-मुंबई महामार्गावर एका बसला आग झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे प्राण वाचले.
अकोला: बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ नागपूर-मुंबई महामार्गावर एका बसला आग झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे प्राण वाचले.
ट्रॅव्हल्समध्ये बिघाड झाल्याने मेहकरजवळ चालक इकबाल खान पठाणने बस रस्त्याच्या कडेला लावून तपासणी केली असता मात्र गाडीच्या इंजिनाने पेट घेतला होता.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घडली. या ट्रॅव्हल्समध्ये 35 प्रवासी प्रवास होते. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाढ झोपलेल्या सर्व प्रवाशांना उठवून त्यांना सामानासह बाहेर काढले.
ट्रॅव्हल्सच्या चालकाचा सर्व प्रवाशांकडून कौतुक होत आहे. मेहकर अग्निशमन दलाने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यात बस पूर्णतः जळून खाक झाली.
मेहकर अग्निशमन दलाने एक तासाच्या अथक प्रयत्ना नंतर आग आटोकयात आणली. यात बस पूर्णतः जळून खाक झालीय.
(संपादन - विवेक मेतकर)