सोशल डिस्टन्सींगचा राशन दुकानातच फज्जा, मोठी उमरी येथे गर्दी टाळण्यासाठी ना नियोजन ना नियमावली

विवेक मेतकर
Thursday, 24 September 2020

राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याकाळात राज्य सरकारमार्फत अनेक गरीबांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील रेशन दुकानातून कार्डधारकांना धान्य देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी या पार्श्वभूमीवर धान्य वितरणासाठी दुकानदारांना घालून दिलेल्या नियमावलीची पायमल्ली होताना दिसत आहे.

अकोला : राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याकाळात राज्य सरकारमार्फत अनेक गरीबांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील रेशन दुकानातून कार्डधारकांना धान्य देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी या पार्श्वभूमीवर धान्य वितरणासाठी दुकानदारांना घालून दिलेल्या नियमावलीची पायमल्ली होताना दिसत आहे.

शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानात सवलतीच्या दरात धान्य वितरीत करण्यात येते. त्यावेळी विनाकारण दुकानात गर्दी होऊ नये, संसर्ग दूर ठेवता यावा यासाठी ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय अन्नधान्य वितरण कार्यालयाकडूनही एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच नागरिकांना धान्य वितरीत करण्यात येणार यायला हवे. मात्र, मोठी उमरी येथील विठ्ठल मंदीर परिसरात सर्व नियम पायदळी तुडवित असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्येक नागरिक राशन घेण्यासाठी गर्दी करीत असून सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणं सर्व दुकानदारांना बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दुकान बंद करण्याचे आणि नागरिकांना घरी परत जाण्याचे पोलिसांकडून निर्देश दिले जाऊ शकतात, असेही यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक राशनधारक घाई असल्याची सबब देत राशन दुकानावर गर्दी करताना दिसतो आहे. सकाळी आठ वाजतापासूनच राशन दुकानावर गर्दी व्हायला लागते. नागिरक उभे राहताना सोशल डिस्टंन्सींगचे पालन करित नाहीत. राशनधारकांना रांगेची सोयही नाही तर तशी मार्किंग केलेली दिसत नाही

हेही वाचा-  डॉक्टर, आता कुठे गेला तुमचा धर्म अन् घेतलेली शपथ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: No planning or regulations to avoid crowds at social distance ration shops