
दिवाळी संपाताच कोरोना विषाणूग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा वाढली असून सध्या जिल्ह्यात ६४२ कोरोनाबाधित रुग्णालयात उपचार असल्याची माहिती आहे. याव्यतिरीक्त रविवारी (ता. ३०) जिल्ह्यात आणखी २८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे.
अकोला ः दिवाळी संपाताच कोरोना विषाणूग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा वाढली असून सध्या जिल्ह्यात ६४२ कोरोनाबाधित रुग्णालयात उपचार असल्याची माहिती आहे. याव्यतिरीक्त रविवारी (ता. ३०) जिल्ह्यात आणखी २८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे.
गत ९ महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोनाचे रविवारी (ता. ३०) जिल्ह्यात १९२ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये १६४ रुग्ण निगेटिव्ह तर २८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
संबंधित रुग्णांमध्ये नऊ महिला आणि १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील चार जण गड्डम प्लॉट येथील, दोघे सिव्हील लाईन्स येथील तर उर्वरित तुकाराम चौक, शिवाजी पार्क देशमुख फैल, सांगवी खु., सोंजवी खु., जीएमसी, गायत्री नगर, कौल खेड, गिताभवन शिवाजी पार्क जवळ, नवलेवाडी अकोट, शिवचरण पेठ, तेल्हारा, डाबकी रोड, राजंदा ता. बार्शी टाकळी, नंदखेड दहिहांडा ता. अकोट, श्रद्धा ले-आऊट, आपातापा, रामनगर, व्यंकटेश नगर, दहिगाव ता. तेल्हारा, सुधीर कॉलनी, मूर्तिजापूर, परिअम्मा कॉलनी खारोळेवाडी येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.
१४ जणांना डिस्चार्ज
कोरोनावर मात करणाऱ्या १४ जणांना रविवारी (ता. ३०) डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, तर आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९४१६
- मृत - २९३
- डिस्चार्ज - ८४८१
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - ६४२
(संपादन - विवेक मेतकर)