VIDEO: विदर्भाचे प्रती पंढरपूर गजबजले, श्रींच्या दर्शनासाठी शेगावात भक्तांची रांग; नियमांचे पालन करीत दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली. याच पार्श्वभूमीवर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारपासून (ता.१७) भाविकांसाठी खुले करण्यात आले.

शेगाव (जि. बुलडाणा)  ः राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली. याच पार्श्वभूमीवर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारपासून (ता.१७) भाविकांसाठी खुले करण्यात आले.

श्रींच्या दर्शनासाठीई मंदिरात भाविकांनी रांगा लावल्या होत्यात. शासनाने घालून दिलेल्या शिस्तीचे पालन व्हावे यासाठी मंदिरात दर्शनासाठी मंदिर प्रशासनातर्फे ई-पास असलेल्यांनाच आत सोडण्यात आले.

कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे संत नगरी शेगावचे श्री संत गजानन महाराज संस्थान ता. १७ मार्चपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले होते.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता ८ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर राज्यातील इतर संस्थानसोबत गजानन महाराज मंदिरही भाविकांसाठी उघडण्यात आले. मंगळवारी पहाटे ५ वाजेपासून श्रींच्या दर्शनासाठीई भाविकांना मंदिरात सोडण्यात आले. पहिल्याच दिवशी मंदिरात भक्तांची रांग लागली होती.

- भाविकांनी शिस्तीत घेतले श्रींचे दर्शन
- प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन
- संस्थांकडून स्वच्छता आणि सेवा भावाचा आदर्श प्रत्येय
- पहिल्या दिवशी राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक संत नगरीत
- ई- पास असणाऱ्यांना दर्शनासाठी सोडण्यात आले मंदिरात

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Pandharpur is buzzing with copies of Vidarbha. Darshan following the rules