esakal | पैसे द्या, नोकरी घ्या, शेगावात टोळीचा पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Pay, get a job, expose gang in Shegaon

बनावट नियुक्ती पत्र देऊन नोकरीवर लावून देणाऱ्या टोळीचा शेगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. यात पाच आरोपितांना अटक करण्यात आली.

पैसे द्या, नोकरी घ्या, शेगावात टोळीचा पर्दाफाश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

शेगाव (जि बुलडाणा)  ः बनावट नियुक्ती पत्र देऊन नोकरीवर लावून देणाऱ्या टोळीचा शेगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. यात पाच आरोपितांना अटक करण्यात आली.


फिर्यादी अशोक भिकाजी मांजरे (वय ५९ वर्ष) हे पटवारी कॉलनी शेगाव येथे त्यांचे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुले आहेत. त्यातील मधला मुलगा शुभम हा बी एस्सी असून काही दिवसांपूर्वी मुलाचा वर्गमित्र अक्षय सूर्यवंशी (रा.निमगाव नांदुरा) व त्याचा मामा नरहरी खवले (रा.कठोरा ता.शेगाव) हे फिर्यादी याचे घरी आले व फिर्यादीचा मुलगा शुभम याला जिल्हा परीषद आरोग्य विभाग अमरावती येथे आरोग्य सेवक म्हणून जागा निघाल्या असल्याचे सांगितले.

तुला नोकरी करायची असेल तर माझ्या ओळखीचे देशमुख सर व मिराशे सर असे लोक आहेत. पैसे देवून तुला नोकरी लावून देतात असे सांगितले. म्हणुन फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा शुभम यास देशमुख सर यांचा मोबाईल नंबर देवून मोबाईल वर बोलून फिर्यादीचे घरी येवून देशमुख  यांनी १४ लाख रुपयात आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावुन देण्याचे ठरले.

आरोपीतांचे सांगणे प्रमाणे आरोपीतांनी अमरावती येथे पंजाबराव देशमुख स्मृती महाविदयालयाचे आवारात बोलावून कार्यालयातून मुलगा शुभम यास आरोपी एजाजोदीन देशमुख (रा.खामगाव) व अमोल मिराशे (रा.खामगाव) यांनी अमरावती येथे कार्यालयाचे आवारात आरोपी सागर आढाव (रा.सुंदरखेड बुलडाणा) ह.मु.विठ्ठल रुख्मीणी अपार्टमेंट न्यू तापडीया नगर शेगाव यांची ओळख करून देवून मुलास कार्यालयाचे आत नेवून आरोपी सागर आढाव याने स्वतः आत कार्यालयातून नियुक्ती पत्र आणून दिले व बाहेर असलेले फिर्यादी यांनी ऑर्डर पाहुन ठरल्या प्रमाणे आरोपीतांनी फिर्यादीस पैशाची मागणी केली.

त्यावेळी फिर्यादी यांनी ऑर्डर व्हेरीफाय करतो व नंतर पैसे देतो असे म्हटल्याने आरोपीतांनी काही तरी पैसे द्या असे म्हटल्याने फिर्यादीने नगदी २५ हजार रुपये दिले. फिर्यादी हे घरी आल्यानंतर आरोपी एजाजोद्दीन देशमुख, अमोल मिराशे (रा.खामगाव) हे पैशासाठी तगादा लावत असल्याने फिर्यादी यांना शंका आल्याने फिर्यादी यांनी अकोला आरोग्य विभागातून ऑर्डर बाबत चौकशी केली असता सदरचे नियुक्ती पत्र हे खोटे असल्याबाबत समजले.

म्हणून फिर्यादी यांनी पोलिसांना माहीती देवून ता. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी माझे घरी सकाळी १० वाजताचे दरम्यान मिराशे सर व देशमुख सर असे दोघे ठरल्याप्रमाणे उर्वरीत १३ लाख ७५ हजार रुपये घेण्यासाठी आले असता फिर्यादीने आरोपी एजाजोद्दीन देशमुख व मिराशे यांना तुम्ही रेल्वे स्टेशन समोर चला त्या ठिकाणी तुम्हाला पैसे देतो असे सांगून पोलिसांना माहीती दिली.

अशा प्रकारे अक्षय सूर्यवंशी (रा. निमगाव ता.नांदुरा), नरहरी लिलाधर खवले (रा.कठोरा), अमोल जनार्दन मिराशे (रा.खामगाव), एजाजुद्दीन सिराजोद्दीन देशमुख (रा.खामगाव) व सागर आढाव (रा.बुलडाणा) यांनी संगणमत करून फिर्यादी यांचा मुलगा शुभम याची फसवणूक केली. म्हणुन नमुद पाच इसमांविरुध्द पोलिस स्टेशन शेगाव शहर येथे गुन्हा दाखल केला आहे.


चार आरोपींना अटक
चार आरोपीतांना अटक करण्यात आली असून, आरोपी अक्षय सुर्यवंशी व इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहोत. गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा अरवींद चावरीया, अप्पर पोलिस अधीक्षक खामगाव हेमराजसींग राजपुत, उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव अमोल कोळी यांचे मार्गदर्शनाखाली व पो.नि. संतोष ताले यांचे नेतृत्वात पोउपनि योगेगशकुमार दंदे, सहा .पो.नी लक्ष्मण मिरगे,पोहेकॉ रमेश काळे, पोना.गणेश वाकेकर, पोना.उमेश बोरसे,पोकॉ विजय साळवे, पोकॉ अमोल परीहार,पोकॉ, बारवाल हे करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)