esakal | काॅफीमधून साकारले छत्रपती; दीपा शर्मा यांनी साैरा आणी वारली केलेचे फ्युजन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Picture of Shivaji Maharaj from Coffee, Deepa Sharmas fusion of Saira and Warli

निसर्गाची नानाविध रुपे, ग्रामीण संस्कृती, हुबेहुब साकारलेली व्यक्तीचित्रे अशा रंग रेषांच्या दुनियेची सफर अकाेल्यातील कलावंत दीपा आलोककुमार शर्मा यांनी साकारत कलेतून संस्कृती दर्शन घडविला.

काॅफीमधून साकारले छत्रपती; दीपा शर्मा यांनी साैरा आणी वारली केलेचे फ्युजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकाेला : निसर्गाची नानाविध रुपे, ग्रामीण संस्कृती, हुबेहुब साकारलेली व्यक्तीचित्रे अशा रंग रेषांच्या दुनियेची सफर अकाेल्यातील कलावंत दीपा आलोककुमार शर्मा यांनी साकारत कलेतून संस्कृती दर्शन घडविला.

एकाच कलांवंताने मधुबनी, मिनाकारी, ॲपन ऑर्ट, रेशम आर्ट, पॅरा आर्ट पाॅप आर्ट अशा विविधांगी कलाप्रकारात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील विविध कलादालनांमध्ये त्यांच्या कलाकृती शोभून दिसतील अशा उच्च दर्जाची चित्रे त्यांनी साकारली आहेत.


गाझीयाबाद येथे जन्मलेल्या, मात्र पतीच्या नाेकरी निमित्ताने देशाातील अनेक राज्यांमध्ये वास्तव्य करताना त्या-त्या राज्यातील कलाप्रकार केवळ आत्मसातच केले नाही तर त्या कलांचे विविध कलांसाेबत ‘फ्युजन’ करून नव्या कलांना जन्म देण्याचेही काम दीपा शर्मा यांनी केले आहे.

बिहारमधील मधुबनी, मुगलकाळातील मिनाकारी, उत्तरांचंलची ॲपन आर्ट, छत्तीसगड मधील मंडाला, गाेदना, पाश्चात देशातील लाेकप्रीय पाॅप आर्ट, यासाेबतच साेरा, वारली, म्युरल, लिपन, क्ले पॅरा असे विविध प्रकार दीपा शर्मा लिलया हाताळतात.

हॅण्डमेड पेपर, नैसर्गिक रंगांचा वापर यावर त्यांचा सर्वाधिक भर आहे. त्यांनी साकारलेल्या कलाकृतींची लाैकीक अर्थाने किंमत लाखाेंच्या घरात आहे; मात्र या कलाकृती विकण्यापेक्षा त्यांचे प्रदर्शन भरून देशभरातील संस्कृतीचे साेबतच या कलांचे दर्शन नव्या पीढीला व्हावे, असे त्या सांगतात.

काॅफीमधून साकारले छत्रपती
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तीमत्व अनेक कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरते. दीपा शर्मा यांनीही महाराष्ट्रात वास्तव करताना छत्रपतीच्या इतिहासाचा अभ्यास केला अन् महाराजांना मानवंदना म्हणून वेगळी कलाकृती निर्माण करण्याचा संकल्प केला. या संकल्पातूनच काॅफीमधून महाराजांची पुर्णाकृती प्रतिमा कागदावर साकारली. केरळ मधून आणलेल्या नैसर्गिक काॅफीचा मेहंदी सारखा लगदा करून त्यांनी महाराजांची प्रतिमा साकारली. अशा प्रकारे काॅफीचा वापर करणाऱ्या त्या एकमेव कलावंत आहेत, हे विशेष.

हेही वाचा - VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

साैरा आणी वारली केलेचे फ्युजन
ओडीसा राज्यातील साैरा आणि महाराष्ट्रातील वारली या दाेन कलांचे फ्युजन करून दीपा शर्मा यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत. आदीवासी संस्कृतीच्या वाहक असलेल्या या दाेन्ही कलांमध्ये बरेचसे साम्य असले तरी त्यामधील प्रमुख वैशिष्ट्यांचा अभ्यास करून दीपा शर्मा यांनी निर्माण केलेले फ्युजन हे नव्या कलेचे बीजाराेपण करणारे ठरले आहे.

सुईचा वापर न करता रेशम आर्ट
रेशमी धागा, गाेंद याचा वापर करून दीपा शर्मा यांनी साकारलेल्या रेशम आर्ट प्रकारातील कलाकृती अतिशय मनमाेहक ठरल्या आहेत. थ्रीडी केलेचा भास व्हावा अशा दर्जाच्या या कलाकृती सुईचा वापर न करता केल्या आहे.

हेही वाचा - स्पर्श विरहित दर्शन व्यवस्थेचा शेगाव पॅटर्न

पेबल आणी मंडाला आर्ट चाही संयाेग
निर्जिव दगडांमध्ये जिवंतपणा आणून त्या माध्यमातून विविध संदेश देणारी ‘पेबल-आर्ट’ ही कला परदेशात मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. या कलेला मंडाला आर्टची जाेड देत दीपा शर्मा अनेक दगडांना शाेभिवंत केले. मंडाला आर्टमध्येही त्यांचा हातखंडा आहे. प्राचीन काळात मंदिरांच्या घुमटावर आतून अतिशय बारीक कलाकुसर या कलाप्रकारात साकारली जात होती.

काेणत्याही प्रदेशाची कला ही त्या-त्या प्रदेशातील संस्कृतीची वाहक असते. साैरा व वारलीचे फ्युजन करताना मी या दाेन्ही संस्कृतीचा अभ्यास केला तर पाश्चात देशातील पाॅप आर्ट हा वेगळा प्रकार हाताळतानाही त्यामागील भावना लक्षात घेतली. अशा कला आर्ट व्हाेकलच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पाेहचविण्यासाठी माझी धडपड सुरू आहे.
- दीपा आलाेककुमार शर्मा, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

loading image