पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर,  १२ डिसेंबरला लागणार अंतिम गुणवत्ता यादी

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 7 December 2020

तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेची सुरवात झालेली असून, प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवार, ता.७ डिसेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेची सुरवात झालेली असून, प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवार, ता.७ डिसेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.

गुणवत्ता यादीतील अडचणी संबंधित आक्षेप असल्यास ता.१० डिसेंबरपर्यंत वेळ विद्यार्थ्यांना दिला आहे.

अंतिम गुणवत्ता यादी ता. 12 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, त्याच दिवसापासून १४ तारखेपर्यंत विद्यार्थी पहिल्या कॅप राऊंडसाठी पसंतीक्रम नोंदवू शकतात.

प्रवेशप्रक्रिया संबंधित अडचणी असल्यास डब्ल्यूडब्ल्यूडबल्यू. डीटीई.इन या संकेतस्थळावर अथवा शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूर येथील सुविधा केंद्रावर संपर्क करावा. प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेला मिळालेल्या मुदत वाढीचा अकोला जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,

असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन, मूर्तिजापूर संस्थेचे प्राचार्य डॉ. ए. ए. गुल्हाने यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Polytechnic admission schedule announced, final merit list to be released on December 12