esakal | रस्त्याची समस्या सुटता सुटेना, पुन्हा दिले मुरूमाचे ठिगळ
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: The problem of the road is not solved, the patch of murma is given again

येथील सिव्हील या रस्त्यावर बांधकाम विभागाने पुन्हा मुरूम टाकल्यामुळे सध्यातरी या रस्त्याचे काम होणार नसल्याचे जणू संकेत दिले आहेत अजुन किती दिवस डांबरी रस्त्याला मुरमाचे ठिगळ दिले जाणार, अजून किती वर्ष यातना भोगाव्या लागणाऱ्या, अशी विचारणा येथील नागरिक करीत आहेत.

रस्त्याची समस्या सुटता सुटेना, पुन्हा दिले मुरूमाचे ठिगळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

रिसोड  (जि.वाशीम) :येथील सिव्हील या रस्त्यावर बांधकाम विभागाने पुन्हा मुरूम टाकल्यामुळे सध्यातरी या रस्त्याचे काम होणार नसल्याचे जणू संकेत दिले आहेत अजुन किती दिवस डांबरी रस्त्याला मुरमाचे ठिगळ दिले जाणार, अजून किती वर्ष यातना भोगाव्या लागणाऱ्या, अशी विचारणा येथील नागरिक करीत आहेत.

शहरातील  हिंगोली नाका ते कालूशा बाबा दर्गा व सिव्हिल लाइन म्हणून ओळखल्या जाणारा व शहरातील अत्यंत वर्दळीचा या रस्त्याची मागील काही वर्षापासून मोठी दुरावस्था झाली आहे पावसाळ्यात चिखलाचा तर आता धुळीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे खड्ड्या मळे वाहन चालकांना  आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

पावसाळ्यात तर या रस्त्याला नाल्याचे रूप येते पावसाळ्यात कित्येक वेळा या रस्त्यावर साप निघाले होते एकंदरीत ग्रामीण भागातील पांदण रस्त्याची पेक्षाही या रस्त्याची परिस्थिती वाईट झाली आहे हा रस्ता बांधकाम विभागाकडे आहे तर पथदिवे व इतर सोयी सुविधा नगर परिषदेकडून पुरविल्या जातात  मागील काही वर्षापासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी   या रस्त्याचे दोन वेळा भूमिपूजन झाले परंतु आज पर्यंत रस्त्याची परिस्थिती जैसे थे  आहे भूमिपूजन करणारे नेतेही गायब झाले आहेत .

 पावसाळ्यात या रस्त्या वरून पाणी वाहिल्या मुळे मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे बांधकाम विभागाने या रस्त्यावर मुरूम टाकला आहे  त्यामुळे सध्या तरी या रस्त्याचे काम होणार नसल्याचे जणू संकेत दिले आहेत अजून किती वर्ष या शहरातील मुख्य रस्त्यावर मुरूम टाकल्या जाणार असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत 

मागील सात आठ महिन्यापासून कोरोनामुळे बांधकामे प्रभावित झाली होती परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे मार्चपूर्वी तरी या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image