esakal | विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शाळेतील प्रवेशाची प्रक्रिया सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: The process of admission of ST students in English school has started

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येतो. या योजनेअंतर्गत प्रवेश सुरू झाले असून, ता. १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शाळेतील प्रवेशाची प्रक्रिया सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येतो. या योजनेअंतर्गत प्रवेश सुरू झाले असून, ता. १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.


यासंदर्भात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत. हे अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय तसेच नजिकच्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळेत मिळतील.

कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातून प्रवेश अर्ज प्राप्त करून न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून तसेच नजिकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करून या कार्यालयास १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज जमा करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image