‘तळ्यातमळ्यात’ : उद्यापासून जनता कर्फ्यू 

मनोज भिवगडे
Thursday, 24 September 2020

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असून, यापृष्ठभूमीवर विदर्भ चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲड इंडिस्ट्रजने ता. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यूची घाेषणा मंगळवारी रात्री उशिरा केली. या जनता कर्फ्यूला जिल्हा प्रशासनाचे समर्थन असल्याचा दावा चेंबर्सने केला.

अकोला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असून, यापृष्ठभूमीवर विदर्भ चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲड इंडिस्ट्रजने ता. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यूची घाेषणा मंगळवारी रात्री उशिरा केली. या जनता कर्फ्यूला जिल्हा प्रशासनाचे समर्थन असल्याचा दावा चेंबर्सने केला.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनीही बुधवारी व्हिडीओ संदेश देत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापारी व जनतेला केले आहे. अकोला इंडस्ट्रियल असोशिएसन आणि भाजपने कर्फ्यू नकोची भूमिका घेतली असून, राजकीय पक्षांनीही जनता कर्फ्यू नको असल्याची भूमिका मांडली आहे. हॉटेल व्यावसायिकांची भूमिकाही तळ्यातमळ्यात असल्याने जनतेकडूनच जनता कर्फ्यू पाळला जाईल का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्हा प्रशासन व आराेग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्याची चिन्हे नाहीत. अनेक व्यापारीही कोरोना संसर्गीत झाले आहे. परिणामी विदर्भ चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲड इंडिस्ट्रजने ता. २२ सप्टेंबर राेजी सर्व संघटनांची ऑनलाईन सभा घेतली.

हेही वाचा- चिमुकल्याला वाचवण्यासाठी बापाची पुरात झुंज, काटेपूर्णा नदीपात्रात वाहून जाणारे दोघेही बापलेक सुखरुप

सभेत २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले. त्याला सर्व व्यापारी संघटना व प्रशासनाचे सहकार्य असल्याचा दावा करण्यात आला. या सभेला ५० पेक्षा जास्त संघटनांचे १०० च्यावर पदाधिकारी ऑनलाइन उपस्थित हाेते. लाेकप्रतिनिधी आणि प्रशासनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा चेंबर्सचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, उपाध्यक्ष निकेश गुप्ता, आशिष चंदराणा यांनी मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्ध पत्रक काढून दिला.

शेजारी जिल्ह्यातील प्रयोग अयशस्वी
जनता कर्फ्यूबाबत नागपूर, अमरावती, वाशीम आणि नुकताच बुलडामा जिल्ह्यात झालेला प्रयोग अपयशी ठरला आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडीच ठेवल्याने बुलडाण्यात दुकाने उघडी ठेवण्यासाठी वेळ निश्चित करावी लागली. जनतेनेही कर्फ्यू झुगारला होता. अकोल्यातही प्रशासनाची अधिकृत भूमिका नसल्याने जनतेच्या मुक्त संचारावर बंदी लादली जाणे अश्यक आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा जनता कर्फ्यू हा त्यांच्याच पुरता बंदचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

आता बेरोजगारांना मिळेल नोकरी; खासगी कंपन्यांची दारे खुली

भाजपचा भर जनजागृतीवर
यापूर्वी लॉकडाउन करण्यात आला होता तो कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयारी करण्याकरिता वेळ मिळावा म्हणून. आता लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. शेतीची कामे पाऊस थांबल्याने सुरू होणार आहेत. रब्बीच्या पेरणीची तयारी सुरू झाली आहे. अकोला इंडस्ट्रिज असोशिएशन कर्फ्यूचा भूमिकेत नाही. लॉकडाउननंतर पुन्हा वेगावे संसर्ग वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बंद ठेवल्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृतीवर भर देण्याची भूमिका भाजपची असल्याचे मत जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.

Vcci Akola - Google Play वरील अ‍ॅप्स
विदर्भ चेंबरला निर्णय मागे घेण्याचे आवाहन
जनता कर्फ्यूबाबत संभ्रम असल्याने आणि आतापर्यंत कुठेच तो यशस्वी न झाल्याने जनता कर्फ्यूचा निर्णयावर फेर विचार करण्याची विनंती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. भाजप व चेंबरचे सदस्य मिळून जनजागृती करू, मास्क न लावता फिरणाऱ्यांना मास्क वितरित करू आणि त्यांना नियमांचे पालन करण्याबाबत विनंती करू, असे आवाहनही आमदार सावरकर यांनी केले आहे.

आता नो मास्क, नो पेट्रोल- नो डिझेल

हॉटेलवरच व्यवसायबंदीचा अन्याय का?; बारामतीतील हॉटेलचालकांचा सवाल | eSakal
हॉटेल व्यावसायिक तळ्यात मळ्यात
विदर्भ चेंबरच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनला हॉटेल व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. असे असले तरी हॉटेल व्यावसायिक याबाबत तळ्यातमळ्यात असल्याचे दिसून येते. संपूर्ण १०० टक्के बंद असला तरच हॉटेल व्यावसायिक त्यांची प्रतिष्ठाणे बंद ठेवणार आहेत. याबाबत अकोला जिल्हा सर्व खाद्य पेय विक्रेता असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी संपूर्ण बंद असला तरी आम्ही त्यात सहभागी होऊ अशी प्रतिक्रिया दिली.

CoronaVirus in Akola : 'एमआयडीसी'तून होऊ शकतो कोरोना उद्रेक - Marathi News  | CoronaVirus in Akola: Corona outbreak can be caused by MIDC | Latest akola  News at Lokmat.com

कारखाने सुरूच राहणार
शहरातील गर्दीचे ठिकाणं कोरोना संसर्गासाठी घातक ठरत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जनता कर्फ्यू पाळणे संयुक्तीक आहे. एक नागरिक म्हणून त्याचे समर्थन होणारच. मात्र एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमध्ये स्थिती वेगळी आहे. येथे गर्दी होत नाही. दररोज ग्राहकांशी संबंध येत नाही. उद्योजक व कामगार एका कुटुंबाप्रमाणे काळजी घेत आहेत. त्यामुळे एमआयडीसीतील कारखाने सुरूच राहतील, असे अकोला इंडस्ट्रियल असोशिएशनचे अध्यक्ष उमेश मालू यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांचा कर्फ्यू गोरगरीबांना वेठीस धरणारा - राजेंद्र पातोडे
अकोल्यातील व्यापाऱ्यांनी वाढत्या रुग्ण संख्येच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर कोरोना साखळी खंडित करण्याचे नावाने २५ ते २९ तारखेपर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. हा प्रकार म्हणजे गोरगरीब जनतेला वेठीस धरून काळा बाजाराला प्रोत्साहन देणारा आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन आणि जनता कर्फ्यू या प्रकारांना मनाई केली असताना व्यापाऱ्यांना जननजीवन बंदिस्त करून कर्फ्यू लावण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केला आहे.

Agriculture news in Marathi Religious programs are not allowed: Collector  Papalkar | Agrowon

जिल्हाधिकारी व आयुक्तांचे सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने विदर्भ चेंबरने जनता कर्फ्यूचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगून त्याला व्यापारी व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे. शहरातील वाढता संसर्ग लक्षात घेता जनतेने स्वतःसाठी लागू करून घेतलेला जनता कर्फ्यू पाळून व्यापारी व नागरिकांनी संसर्गापासून स्वतःला वाचवावे, असे आवाहन कापडणीस यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Public curfew from tomorrow