esakal | राजनापूर ग्राम पंचायत ठरली पहिली आयएसओ नामांकन प्राप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Rajnapur Gram Panchayat gets first ISO nomination

 राज्यमंत्री बच्चू कडू यांचे दत्तक गाव राजनापूर (खिनखिनी) ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन प्राप्त झाले असून ते प्राप्त करणारी ही ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली ठरली आहे.

राजनापूर ग्राम पंचायत ठरली पहिली आयएसओ नामांकन प्राप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर :  राज्यमंत्री बच्चू कडू यांचे दत्तक गाव राजनापूर (खिनखिनी) ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन प्राप्त झाले असून ते प्राप्त करणारी ही ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली ठरली आहे.

उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, बीडीओ, विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत हे नामांकन पत्र सरपंच प्रगती रुपेश कडू व ग्रामसेवक संदीप गाडेकर यांना प्रदान करण्यात आले.

या ग्रामपंचायतीला आजपर्यंत स्मार्ट विलेज पुरस्कार-२०१९, हागणदारी मुक्त गाव, पेपरलेस ग्रामपंचायत पुरस्कार, ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार आणि आता आयएसओ ग्रामपंचायत असे अनेक पुरस्कार दोन वर्षांत मिळाले आहेत.

हे संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत आहे. ग्रामपंचायतचे पूर्ण कामकाज ऑनलाईन चालते. संपूर्ण गावात सौरऊर्जाकरण, सर्व ग्रामपंचायत संस्था सौरऊर्जेवर, भूमिगत गटार, घर तेथे रस्ता-गाव तेथे घर, पालकमंत्री उद्योग योजनेमार्फत अनेक योजनांचे लाभ, अशा अनेक जनउपयोगी योजना या ग्रामपंचायतीने राबविल्या आहेत. आयएसओ नामांकन प्राप्तीसाठी गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले. आयएसओसाठी आवश्यक सर्व बाबी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या.


गावकरी आनंदित
तालुक्यातून राजनापुरला पहिलं आयएसओ नामांकन प्राप्त झालं. त्यामुळे सर्व गावकरी आनंदित आहेत. जनसेवेसाठी आम्ही तास २४ उपलब्ध राहतो आणि ग्रामस्थही आम्हाला तेवढीच सकारात्मक साथ देतात. त्यामुळे हा सन्मान प्राप्त होऊ शकला, त्याचं सगळं श्रेय ग्रामस्थांना असल्याचे सरपंच प्रगती रुपेश कडू व ग्रामसेवक संदीप गाडेकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)