बेताल व्यक्तव्य करणाऱ्या दानवेंची काढली गाढव धिंड, शिवसेनेच्या वतीने जिल्हाभरात निषेधार्थ आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 12 December 2020

 दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी हे पाकिस्थानी व खलिस्थानी असल्याचे व्यक्तव्य भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ जिल्हाभर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

अकोला : दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी हे पाकिस्थानी व खलिस्थानी असल्याचे व्यक्तव्य भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ जिल्हाभर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कुठ त्यांच्या प्रतिकात्मक गाढव धिंड काढण्यात आली. तर, कुठे रास्तारोको आंदोलन करून दानवेंच्या विरोधात घोषणाबाजीकरून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Image may contain: 10 people, people standing and outdoor
पातुरात रास्तारोको आंदोलन
पातूर : जगाचा पोशिंदयाला त्याचा मूलभूत हक्क मिळवून देऊन त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी तसेच शेतकरी स्वातंत्र्यावर गदा आनणाऱ्या शासनाला धडा शिकविण्यासाठी देशभर आंदोलने मोर्चे उपोषणे सुरू असतानाच शेतकरी विरोधी वक्तव्य करून शेतकऱ्यांविषयी अपशब्द बोलून शेतकऱ्यांची थट्टा करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्या विरोधात शनिवारी (ता.१२) शहरात बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या आदेशावरून दुपारी साडेबारा वाजता येथील जुने बस स्थानकवर तालुका शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करून विरोध दर्शविण्यात आला. यावेळी तालुका शिवसेना प्रमुख रविंद्र मुर्तडकर यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, जि.प. सदस्य संतोष सरदार, जि.प. सदस्य पंजाब पवार, पं.स.सदस्य नंदू डाखोरे, गजानन पोपळघट, शंकर देशमुख, डॉ. दिगंबर खुरसळे, अरुण कचाले, सागर रामेकर, काशिनाथ महल्ले, बाळू वसतकार, राजू भगत, संजय वाडेकर, अनंता टाले, नंदू डाखोरे, जनार्दन डाखोरे, मेहबूब भाई, मुख्तार भाई, मुस्ताक राना, गणेश काळपांडे, राहुल शेगोकार, विशाल बीडवाले, प्रसाद बीडवाले, कुददुस भाई, सचिन तायडे, अशोक बोराडे, ज्ञानेश्वर देवकर, हर्षदा देवकर, सुनंदा वालोकार, राजश्री बोराडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यक्रर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Image may contain: 14 people, people standing and outdoor, text that says "रावसाहेब दानवे जाहीर निषेध जाहीर निषेध विनीत शिवसेना युवासेना तेल्हारा तालुका व शह"
तेल्हाऱ्यात काढली प्रतिकात्मक गाढव धिंड
तेल्हारा ः दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन पाकिस्थानी, खलिस्थानी आहे असे बेताल वक्तव्य करणारे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने गाढव धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला. स्थानिक टॉवर ते संत तुकाराम महाराज चौक मार्गाने दानवेंची प्रतिकात्मक गाढव धिंड काढण्यात आली. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचाही निषेध नोंदविण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दिवसांदिवस भाव वाढतच असून, सर्व सामन्य नागरिकांची लूट होत आहे. केंद्र सरकार सामान्य नागरिकांच्या जीवावर उठले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना प्रखर विरोध करून आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला हारपर्ण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर टॉवर चौक येथे दानवेंच्या प्रतिकात्मक गाढवाची धिंड काढून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड, शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे, जि.प. सदस्य संजय अढाऊ, माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के, राजेश वानखडे, जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे, रामा फाटकर, अजय गावंडे, पंकज कवर, प्रज्वल मोहोड, संजय जयस्वाल, विवेक खारोडे, गजानन मोरखडे, प्रकाश देशमुख, दिलीप पिवाल, गौरव देशमुख, किशोर डांबरे, आदेश महल्ले, मयूर सुगंधी सह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Image may contain: 3 people, people standing and outdoor
अकोटात इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध
अकोट ः शनिवारी (ता.१२) शिवसेनेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गॅस व इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस च्या किमतीत भरमसाट वाढ केल्याने जनसामान्य लोकांना या दरवाढीचा फटका बसलेला असल्याने ही जी दरवाढ केंद्र सरकारने केलेली आहे. या विरोधात शिवसेनेने केंद्र सरकारचा निषेध केला आहे.
ज्यांच्यामुळे हा देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अशा शेतकऱ्यांची अवहेलना भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी केली आहे. यांच्या या बेताल वक्तव्यामुळे आज शेतकरी पुन्हा दुखावला गेला आहे. आणि याचाच निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने रावसाहेब दानवे यांचा पुतळा गाढवावर बसून शहरभर शिवसेनेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकर, युवासेना विस्तारक राहुल कराळे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, शहर प्रमुख सुनील रंधे, जि.प. सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, विजय अंभोरे, रोशन पर्वतकर, सुभाष सुरतने, जि.प. सदस्य राजेंद्र मोरे, पं.स. सदस्य मुरलीधर खोटे, रमेश खिरकर, विजय ढेपे, कुणाल कुलट, गोपाल कावरे, शिवा गोटे, संजय भट्टी, गजानन जायले, गोविंद चावरे, कमल भास्कर, प्रशांत रनगिरे, रणजित कहार, उमेश आवारे, सोपान साबळे, विजय भारसाकळे, दिवाकर भगत, प्रशांत येऊल, रमेश खिरकर, दीपक रेखाते, विलास ठाकरे, वासुदेव गावंडे, चंडकिशोर तायडे, विक्रम मोडक, नितीन काकड, देवा मोरे, भंगाळे, देवा कायवाटे, सुनील वानखडे, दुर्गा शिवरकार, रोहन अंभोरे, राजू ठाकूर, अनिल वानखडे, गजानन सोळंके, गजानन सातपुते तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Raosaheb Danves ass kicked out, Shiv Sena protests across the district