आरपीआय नेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत राडा, सात जणांना अटकः तीन आरोपी फरार

सकाळ वृत्तसेेवा | Monday, 7 December 2020

जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाशीम बायपासवर रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राडा झाला.

आरपीआय नेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत राडा
सात जणांना अटकः तीन आरोपी फरार
सकाळ वृत्तसेवा
अकोला :  जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाशीम बायपासवर रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राडा झाला.

गोंधळ घाणाऱ्यांनी एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. घटनेतील अन्य आरोपी नगरसेवक फिरोज खानसह इतर फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या वाशीम बायपास रोडवर एका खासगी हॉटेलवर वाढदिवसाची पार्टी शनिवारी आयोजित करण्यात आली होती.

Advertising
Advertising

कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. पार्टीतील एका युवकाच्या गाडीला धक्का लागल्या कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

त्याचवेळी वाशीमहून अकोल्याकडे येत असलेल्या एसटी बसवर काही दगडफेक करीत काचा फोडल्या. त्यामुळे घटना स्थळी जुने शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतले. या प्रकरणी रिपाईचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे , नगरसेवक फिरोज खान, युवराज भागवत यांच्यासह काही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यातील ७ आरोपीं अटक करण्यात आली तर कांबळे, फिरोज खान, भागवत फरार असल्याची माहिती जुने शहर पोलिसांनी दिली.
(संपादन - विवेक मेतकर)