अबब...१२ फुटाचा अजगर...!

Akola News saw a 12-foot dragon
Akola News saw a 12-foot dragon

तेल्हारा (जि.अकोला) : अजगर या  प्राण्याबद्दल आपल्या मनात भीतीयुक्त कुतूहल असते. आपल्यापैकी अनेकांनी तो लहानपणी गारुडय़ाच्या टोपलीत बघितला असेल. आता अशा प्रकारे प्राणी बाळगण्यास कायद्याने बंदी असल्यामुळे अजगर आपल्याला प्राणी संग्रहालयात किंवा दूरदर्शनच्या वाहिन्यांवर बघायला मिळतो.

सर्व सापांप्रमाणे अजगरदेखील आपलं भक्ष्य संपूर्ण गिळतो. अजगराला आपल्यासारखे चर्वण करण्याचे, लचके तोडण्याचे असे वेगळे दात नसतात. तसेच त्याचा वरचा आणि खालचा जबडा सैलसर अस्थिबंधनांनी जोडलेला असल्यामुळे तो काटकोनात आ वासू शकतो. म्हणूनच तो ससा, भेकर, हरीण असे लहान-मोठे प्राणी सहज गिळू शकतो.

अजगर हा शीत रक्ताचा प्राणी आहे. त्याच्या परिसराच्या तापमानाप्रमाणे त्याचे शरीर थंड वा गरम पडते. त्याचा चयापचयाचा वेगही कमी असतो. शरीर सतत उष्ण राखण्याची आवश्यकता नसल्यामुळे त्याला ऊर्जाही कमी लागते. या सर्वामुळे अजगराने एकदा भक्ष्य गिळले, की अनेक दिवस काही खाल्ले नाही तरी त्याला चालते. या काळात तो सुस्तावतो.

खरं म्हणजे जेव्हा अजगराला भूक लागते तेव्हा तो खूप चपळ असतो. पाणवठ्यावर प्राणी जेव्हा पाणी प्यायला येतात तेव्हा तेथे दबा धरून बसलेला अजगर चपळाईने भक्ष्यावर हल्ला करून त्याला पकडतो;

परंतु ही गोष्ट सामान्य माणसाला माहीत नसते. त्यामुळे सतत सुस्त दिसणाऱ्या अजगराला बहुधा देवच खाद्य देत असणार असे वाटून ‘अजगर का दाता राम’ असा शब्दप्रयोग हिंदीत रूढ झाला.

अर्थात हा शब्दप्रयोग अजगरासारख्या मंद व आळशी मनुष्याच्या बाबतीत वापरला जातो. सणासुदीच्या दिवशी पोटभरून गोडाधोडाचं जेवण झालं की आपल्यालाही अशीच सुस्ती येते आणि दोन-तीन तास आपण अजगरासारखे डाराडूर पडून राहतो.  

काल आडगाव शेतशिवारातील सुरेश माणिक शेंडे यांचे शेतात अजगर प्रजातीचा साप वनविभाचे कर्मचारी व सर्पमित्र यांनी पकडला. मात्र, सामान्यांना हा अजगर पाहण्याचंच अप्रुप होतं.

 पशुधन विकास अधिकारी अकोट यांचे मार्फत प्राथमिक उपचार करून या अजगरास मेळघाट वाघ्र प्रकल्पाच्या जंगल क्षेत्रात सोडण्यात आले.

ही कार्यवाही ए .एन. बावणे वनपरिमंडळ अधिकारी अकोट (प्रादे) वर्तुळ , श्री .डी. ए . सुरजुसे वनरक्षक बोर्डी बीट, श्री .जी.पी. घुडे वि.सेवा अकोट, एस.जी. जोंधळे, वनरक्षक शहानूर बीट व अकोट वनकर्मचारी तसेच सर्पमित्र मंगेश गंगतिरे व सागर कस्तुरे यांनी केली. या अजगराची लांबी १२ फुट २ इंच, जाडी 40 सेंमी व वजन ३३ किलो होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com