सराफा दुकानातील नोकराने दुकानासमोरच घेतला गळफास!

सकाळ वृत्तसेेवा | Friday, 27 November 2020

जयस्तंभ चौकातील व्यापारी संकुलातील सूरज ज्वेलर्स या सराफा दुकाना समोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरूवार दि २७ नोव्हेंबरला उघडीस आली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश देशमुख आहे.

मूर्तिजापूर (जि.अकोला):  जयस्तंभ चौकातील व्यापारी संकुलातील सूरज ज्वेलर्स या सराफा दुकाना समोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरूवार दि २७ नोव्हेंबरला उघडीस आली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश देशमुख आहे.

प्रकाश देशमुख हे शहरातील जुन्या सराफा लाईन येथील रहिवासी असून ते गेल्या 30 वर्षांपासून सूरज ज्वेलर्सचे मालक शिव कुमार वर्मा यांच्या कडे काम करीत होते.त्यांनी दुकानाच्या वरच्या माळ्यावर जाऊन दोरी बांधून गळफास घेतला त्यामुळे आत्महत्या की हत्या ? हे चित्र अस्पष्ट आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

Advertising
Advertising

सदर घटना मध्यरात्री घडली असावी कारण सूरज ज्वेलर्स हे शहराच्या मुख्य राहिदारीत असल्याने रात्रीही या ठिकाणी तुरळक लोक असतात. आर्थिक अडचणीतून केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर चे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

(संपादन -विवेक मेतकर)