पोलिसांसाठी पोलिस ठाण्यातच लोकसहभागा व कर्मचारी वर्गणीतून  तयार केला ‘आसरा’

Akola News: A shelter for the police was created in the police station itself through public participation and staff subscription
Akola News: A shelter for the police was created in the police station itself through public participation and staff subscription

मालेगाव (जि.वाशीम) :  नागपूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर मालेगाव शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सैनिक, एसआरपीएफ चे जवान इथे रात्री मुक्कामी थांबतात. त्याठिकाणी त्यांची योग्य सोय होत नसल्याने स्थानिक पोलिस स्टेशनचे ठाणेदार, पोलिस कर्मचाऱ्यांचे दीड लाख रूपये व लोक सहभागातून जमा करण्यात आलेल्या रक्कमेतून ‘आसरा’ नावाने नवीन विश्रामगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे.


स्थानिक पोलिस ठाण्यात ठाणेदार व पोलिस कर्मचाऱ्यांचे दीड लाख रूपये तसेच लोकसभागातून ‘आसरा’ हे विश्राम भवन बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्री गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव, मोहरम, ईद आदी सणाच्या वेळी येणारे अतिरिक्त पोलिस कर्मचारी, दंगा विरोधी पथकाचे कर्मचारी यांना पोलिस ठाण्यात थांबण्याची सोय नव्हती.

त्यामुळे ठाणेदारांना त्यांची मुक्कामाची व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थान नागरातच किंवा मालेगाव शहरातील मंगल कार्यालयात करावी लागायची. ही बाब लक्षात घेऊन ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात हे विश्रामगृह बांधण्याचा विचार केला. या बांधकामासाठी जिल्ह्या पोलिस अधीक्षक यांची परवानगी घेतली.

त्यांनतर सहकारी-कर्मचारी यांच्याशी विचार विनिमय केला सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी दीड लाख रूपये जमा करून ठाणेदारांना सहकार्य केले. उर्वरित लोक सहभागातून ३० फूट x ३० फूट आकाराचे हे विश्रामगृह उभे केले. यामध्ये स्वयंपाकगृह व स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली. बाजूला स्वच्छता गृहही बांधण्यात आले आहे. विश्राम गृहामुळे पोलिस कर्मचारी व येथून जाणारे सैन्यदलाचे कर्मचाऱ्यांची सोय होणार आहे.

हेही वाचा :    एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी समितीही नाही

मालेगाव पोलिस व लोक सहभागातून ‘आसरा’ बांधून चांगले कार्य केले आहे.
-रेखा बळी, नगराध्यक्ष, मालेगाव.

पोलिस व सैन्य दलाच्या कर्मचाऱ्यांची सोय या विश्राम गृहाने होणार आहे. त्यासाठी सर्व पोलिस कर्मचारी व इतर नागरिकांनी सहकार्य केले आहे.
-आधारसिंग सोनवणे, ठाणेदार, मालेगाव पोलिस स्टेशन.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com